'ऑनलाइन'च्या जाचामुळे शिक्षकाची आत्महत्या

दिपक कच्छवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मुलीने दिला अग्निडाग 
आबासाहेब चौधरी हे अत्यंत शांत व  मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांना दोन मुली मोठी मुलगी आश्विनी बारावीत तर दुसरी शितल ही सातवीत शिकत आहे.मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी चाळीसगावला घर घेतले होते.आज सायंकाळी पाचला पिंपळवाड म्हाळसा या  त्यांच्या मुळ गावी अंत्यसंकार करण्यात आले.त्यांची लहान मुलगी शितल हिने त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या बाबत मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : शासनाने शाळांमध्ये सुरू केलेल्या 'सरल' प्रणाली 'च्या' 'ऑनलाईन'कामकाजाला कंटाळून देशमुखवाडी (ता. चाळीसगाव) येथील शाळेतील शिक्षकाने आपल्या मुळ गावी पिंपळवाड म्हाळसा (ता. चाळीसगाव) येथील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली भाऊ असा परिवार आहे.आत्महत्या करण्यापुर्वी शिक्षकाने अत्यंत भावनिक चिठ्ठी लिहून आपन 'ऑनलाईन' कामकाजाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.

याबाबत माहिती अशी, पिंपळवाड म्हाळसा येथील मुळ रहिवासी असलेले आबासाहेब भिकन चौधरी( वय 42) हे सध्या चाळीसगावला पत्नी व दोन मुलीसोबत राहतात.सध्या ते देशमुखवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. या शाळेत दोनच शिक्षक असुन. त्यात ते वरिष्ठ शिक्षक होते.परिणामी शालेय पोषण आहाराची माहिती विद्यार्थ्याची दैनदिन हजेरी आदि सर्व माहिती ऑनलाईन  पाठवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.( ता.29) बहिणीला सोडायला जातो असे सांगुन चाळीसगावहुन ते निघाले. पिंपळवाड म्हाळसा या मुळ गावी ते आले येथील गंगाराम हरचंद चौधरी यांच्या शेतातील लाकडी ओंडक्याला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. ही घटना सकाळी सहा वाजेच्या पुर्वी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

खिशात सापडली चिठ्ठी
आत्महत्या करण्यापुर्वी आबासाहेब चौधरी यांनी खिशात चिठ्ठी लिहून ठेवली होती, आशी माहीती पोलिसांनी दिली.उपनिरक्षक नजीम शेख व साहाय्यक फौजदार नरेंद्र सरदार यांनी घटनास्थळी जाऊन  पंचनामा करून चिठ्ठी चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे.या चिठ्ठीत आबासाहेब चौधरी यांनी त्यांच्यानंतर त्यांची पत्नी व मुलींची काळजी घेण्याबाबत सहकारी मित्रांना विनंती केली आहे.सोबतच माझ्या आत्महत्याला कोणालाही कारणीभूत ठरवु नये.मी शासनाच्या 'ऑनलाईन' कामाच्या तणावामुळे आत्महत्या करीत आहे.असे नमूद केले आहे.

मुलीने दिला अग्निडाग 
आबासाहेब चौधरी हे अत्यंत शांत व  मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांना दोन मुली मोठी मुलगी आश्विनी बारावीत तर दुसरी शितल ही सातवीत शिकत आहे.मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी चाळीसगावला घर घेतले होते.आज सायंकाळी पाचला पिंपळवाड म्हाळसा या  त्यांच्या मुळ गावी अंत्यसंकार करण्यात आले.त्यांची लहान मुलगी शितल हिने त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या बाबत मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Jalgaon news teachers suicide in chalisgaon