जळगाव: नववधूचा रोकड व दागिन्यांसह पोबारा

सी. एन. चौधरी
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

पळशी (ता. सातारा) येथील बबन चव्हाण यांचा मूलगा रसिकचा विवाह करायचा असल्याने चव्हाण कूटूंबीय वधूचा शोध घेत होते. त्यांची मूलगी शितल ही नासिक येथे आहे. तीने आपल्या ओळखीतील शरद बडगुजर (रा. पाचोरा) यांना त्या बद्दल कल्पना दिल्यानंतर शरद न मनिषा मोरे नामक मूलगी असल्याचे सांगून मूलगी दाखवली. पसंती अंती बोलणी झाली.

पाचोरा (जि. जळगाव) : विवाहानंतर नवसासाठी देवीला जायचे कारण सांगून नववधू रोकड व दागिन्यांसह आपल्या आई व आजीसोबत पळून गेली. या प्रकरणातील मध्यस्थाला सातारा पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. मुलींची संख्या कमी असल्याने परप्रांतातुन वधू आणून विवाह करणाऱ्यांना ही शिकवण ठरली आहे.

प्राप्त माहिती अशी की, पळशी (ता. सातारा) येथील बबन चव्हाण यांचा मूलगा रसिकचा विवाह करायचा असल्याने चव्हाण कूटूंबीय वधूचा शोध घेत होते. त्यांची मूलगी शितल ही नासिक येथे आहे. तीने आपल्या ओळखीतील शरद बडगुजर (रा. पाचोरा) यांना त्या बद्दल कल्पना दिल्यानंतर शरद न मनिषा मोरे नामक मूलगी असल्याचे सांगून मूलगी दाखवली. पसंती अंती बोलणी झाली. दिड लाख रूपये व दोन तोळा सोन्याचे दागीने नवरीला देवून वाई येथील मंदिरात विवाह पार पडला. निवडक नातलग उपस्थित होते. विवाहानंतर मनीषा च्या अंगात बाहेरचे वारे आहे. त्यासाठी देवीला नवस द्यायचा आहे, असे सांगून नववधू मनीषा तिची आई व आजी नवरदेव त्याची बाहिण व भाचा हे खासगी बसने नासिक येथे आले देवीला जाण्यासाठी दोन रिक्षा करण्यात आल्या. एका रिक्षात नव वधू मनीषा तिची आई व आजी हे तिघे बसले व दूसऱ्या रिक्षात नवरदेवा कडील मंडळी बसली आणि रिक्षातूनच नववधू पळून गेली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बबन चव्हाण यांनी नासिक पोलिसांत तक्रार दिली.

पळशी ( सातारा) येथे ही गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास गतीमान केला. यातील मध्यस्थ शरद बडगुजर हा पाचोरा येभील असून त्यानेच नासिक येथे बबन चव्हाण यांच्या मूलीला मनीषा चे स्थळ दाखविल्याने सातारा पोलिस शरदच्या शोधार्थ पाचोरा येथे आले व त्यांना मध्यरात्री दिडचे सुमारास स्थानिक पोलिस कर्मचारी राहूल सोनवणे,किरण पाटील,तुकाराम पाटील यांच्या मदतीने शरद ला कृष्णापूरी भागातुन ताब्यात घेवून अटक केली. एखाद्या चित्रपटाच्या कथानका प्रमाणे असलेल्या या प्रकरणाची खमंग चर्चा शहरात रंगत आहे.

Web Title: Jalgaon news thief in chalisgaon