‘थर्टी फर्स्ट’चा उत्साह घटला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

हॉटेल्समधील पार्टीचे प्रमाण यंदा २० टक्‍क्‍यांनी कमी
जळगाव - ‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशन करताना नववर्षाचे स्वागत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात केले जाते. यानिमित्ताने ठिकठिकाणी पार्टीचे नियोजन होते, तर अनेकजण हॉटेल्समध्ये जाऊन तेथील आयोजित कार्यक्रमात नाचण्याचा आनंद घेत ‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशन करतात. पण, यंदा हे प्रमाण आणि उत्साह काहीसा कमी झालेला पाहण्यास मिळाला. यातच हॉटेल्समध्ये जाऊन सेलिब्रेशन करण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत पंधरा ते वीस टक्‍क्‍यांनी घटल्याचे हॉटेल व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

नववर्ष स्वागतानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करून रात्री बारापर्यंत एन्जॉय करायचा आणि बाराचे टोल झाले, की आतषबाजीने नववर्षाचे स्वागत करत एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या... असा हा माहोल असतो... रविवारी (३१ डिसेंबर) नववर्षाचे स्वागतासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम झाले. प्रमुख हॉटेल्समध्ये देखील यासाठीचे आगाऊ बुकिंग करून ठेवण्यात आले होते. प्रत्येकाच्या ठरलेल्या नियोजनानुसार नववर्षाचे स्वागत झाले. पण, दरवर्षी दिसणारा आणि जाणवणारा उत्साह यंदा जरा कमीच पाहण्यास मिळाला. 

हॉटेल्स्‌मधील प्रमाण घटले
संगीत, नाचगाण्यांचा आनंद घेत नववर्षाचे स्वागत करणे अनेकजण पसंत करतात; त्यानुसार थर्टी फर्स्ट कार्यक्रमांचे आयोजन अनेक हॉटेल्समध्ये करण्यात आले होते. पण गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हॉटेल्समध्ये जाऊन करण्यात आलेले सेलिब्रेशनचे प्रमाण हे दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. इतकेच नाही, तर थर्टी फर्स्टच्या रात्री शहरात असलेला उत्साह देखील फारसा पाहण्यास मिळाला नाही. गतवर्षी हॉटेलमध्ये झालेल्या सेलिब्रेशनच्या तुलनेत काल (ता.३१) झालेल्या कार्यक्रमांना उपस्थिती कमी राहिल्याचे हॉटेल व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. हॉटेल्समध्ये केवळ जोडीलाच प्रवेश असल्याने मर्यादित संख्येत सेलिब्रेशन झाल्याचे हॉटेल प्रेसिडेंटचे व्यवस्थापक रतन रसावदी यांनी सांगितले.

पार्सल नेण्यावर भर
हॉटेल्समध्ये जाऊन सेलिब्रेशन करण्यापेक्षा घरीच परिवारासोबत किंवा घराच्या गच्चीवर, कॉलनीत मित्रांसोबत सेलिब्रेशन करण्यावर अनेकांनी यंदा भर दिला. यामुळे ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टीच्या बेताने अनेकांनी हॉटेलमधून किंवा रस्त्यावरील चायनीज, बिर्याणी, पावभाजी यांचे पार्सल नेणे पसंत केल्याने पार्सल घेणाऱ्यांची गर्दी अधिक पाहण्यास मिळत होती. म्हणूनच हॉटेलमधून जाऊन सेलिब्रेशन करणाऱ्यापेक्षा पार्सल नेणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे हॉटेल जलसाचे संचालक जितेंद्र कांकरिया यांनी सांगितले.

Web Title: jalgaon news thirty first celebration