बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक शाखेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

जळगाव - विचित्र नंबरप्लेट, ट्रिपलसीट दुचाकीस्वार, फॅन्सी नंबर, सीटबेल्ट न लावणे आदी विविध कारणांस्तव वाहनधारकांविरोधात आज शहरात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. दिवसभरात १६८ केसेस करून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील पंचम हॉस्पिटल, कालिंकामाता चौक, फुले मार्केट आदी ठिकाणी पोलिसांनी वाहन तपासणी केली. 

पोलिस निरीक्षक विलास सोनवणे, ज्ञानेश फरतडे, उपनिरीक्षक सतीश जोशी, कर्मचारी विजय जोशी, संजय मराठे, संजय पाटील, अशोक महाजन, धनराज पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, संतोष सोनवणे, महिला पोलिस कर्मचारी ज्योती साळुंखे, सुनीता पाटील, कविता विसपुते, स्वप्नाली सोनवणे यांनी ही कारवाई केली. दंडात्मक कारवाईसह काही खटले न्यायालयात पाठवण्यात आले असून, त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने कारवाई होणार असल्याचे वाहतूक शाखेतर्फे कळविण्यात आले. 

दरम्यान, बेशिस्त वाहन चालकांस कारवाईसाठी थांबवले असता  राजकीय पुढारी आमदारांपर्यंत फोन करून दबावाचा प्रयत्न नेहमीच होतो. आज एका वाहनधारकाने तिघा वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. नंतर पोलिस ठाण्यात नेल्यावर त्याने माफी मागितल्याने प्रकरण आपासांत मिटले.
 
Web Title: jalgaon news traffic police action on Unconscious driver

टॅग्स