भूमिगत गटार योजनेस अंतिम मान्यतेची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

जळगाव - शहरास अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा, भूमिगत गटारी व मल:निसारण योजना मंजूर झाल्या आहेत. या दोन्ही योजनांच्या कामांसाठी जैन इरिगेशन कंपनीची निविदा मंजूर झाली असून, पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर भूमिगत गटारींच्या कामाची निविदा अंतिम मान्यतेसाठी महापालिका प्रशासनाने शासनाकडे पाठविलेली आहे. परंतु, शासनाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे शासन केव्हा मंजुरी देते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. 

केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरासाठी भूमिगत गटारी व मल:निसारण योजनेसाठी १३१ कोटी ५६ लाखांची योजना आणि १९१ कोटी ८६ लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. यात दोन्ही योजनेच्या कामांची जैन इरिगेशन कंपनीची निविदा मंजूर झाली असून, पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार कंपनीतर्फे लवकरच कामाला सुरवात होणार आहे. त्याचबरोबर भूमिगत गटारी योजनेचे काम करण्याची जैन कंपनीची निविदा मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी महापालिका प्रशासनाने शासनाकडे पाठविली आहे. परंतु याबाबत शासनाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ही मान्यता लवकर मिळाल्यास पाणीपुरवठा व भूमिगत गटारी योजनेचे काम एकाचवेळी सुरू झाल्यास या योजनेतून काम लवकर पूर्ण होणार आहे.

पाणीपुरवठा योजनेसाठी जागांचे मोजमाप
अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने जैन इरिगेशन कंपनीला दिले आहेत. त्यानुसार लवकरच या योजनेच्या कामाला सुरवात होणार असून, कंपनीतर्फे यंत्रसामग्री, मनुष्यबळ उपलब्ध करून प्रत्यक्ष जागांचे मोजमाप करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. 

भूमिगत गटारी योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत
भूमिगत गटार व मल:निसारण योजनेचे काम पाणीपुरवठा योजनेसोबत एकत्र केले जाणार आहे. परंतु शासनाकडून अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही. दोन्ही कामे एकाचवेळी सुरू झाल्यास शहरात पाणीपुरवठा व भूमिगत गटारींचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होऊन मोठा दिलासा नागरिकांना मिळणार आहे.

या परिसरात होणार गटारींची कामे   
मेहरुण, आदर्शनगर, गणपतीनगर, आकाशवाणी चौक, जोशीपेठ, सिंधी कॉलनी, मास्टर कॉलनी, रज्जा कॉलनी, कासमवाडी, सालारनगर, रामेश्‍वर कॉलनी, कालिंकामाता परिसर, का. ऊ. कोल्हे शाळा परिसर, जुने जळगाव परिसर, नवीपेठ, पोलन पेठ, बळिरामपेठ, शिवाजीनगर, प्रजापतनगर, जगन्नाथनगर, एस. टी. वर्क शॉप परिसर, कोर्ट चौकातील पूर्व भाग, सावित्रीनगर, श्रीकृष्ण कॉलनी, कोंबडीबाजार, पांझरापोळ, जिल्हा रुग्णालय परिसर, रामदेवबाबा मंदिर परिसर, कंवरराम चौक, स्वातंत्र्य चौक पूर्व भाग, गांधीनगर, गुजराथीनगर, बी. जे मार्केट परिसर, मेस्कोमातानगर आदी ठिकाणी भुयारी गटारींची कामे पहिल्या टप्प्यात सुरू होतील.

Web Title: jalgaon news underground dranage scheme final permission