"ट्रू जेट'तर्फे उद्यापासून जळगाव-मुंबई सेवा सुरू 

"ट्रू जेट'तर्फे उद्यापासून जळगाव-मुंबई सेवा सुरू 

"ट्रू जेट'तर्फे उद्यापासून जळगाव-मुंबई सेवा सुरू 

जळगाव "ट्रू जेट' या कंपनीतर्फे येत्या रविवारपासून (1 सप्टेंबर) जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू होत आहे. त्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी पुढाकार घेतला. रविवारी (1 सप्टेंबर) सकाळी साडेनऊला येथील विमानतळावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विमानसेवेचा प्रारंभ होईल. जळगाव ते मुंबई व जळगाव ते अहमदाबाद अशा दोन ठिकाणांवरून ही सेवा सुरू होत आहे. त्यादृष्टीने "ट्रू जेट'तर्फे तयारी पूर्णत्वास आली आहे. 
विमान प्राधिकरणातर्फे "ट्रू जेट' या कंपनीस विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात सर्व त्या परवानगी मिळाल्या आहेत. कोणत्याही प्रकारची परवानगी बाकी नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू होईल. जळगाव ते मुंबई व जळगाव ते अहमदाबाद दरम्यान सुरू होणाऱ्या या सेवेला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती "ट्रू जेट' या कंपनीच्या सूत्रांनी "सकाळ'ला दिली. 
"ट्रू जेट'च्या वेबसाइटवर ऑनलाइन तिकीट बुक करण्याची सेवा आहे. अनेक नागरिकांनी ऑनलाइन तिकीट बुकही केले आहेत. गेल्या सोमवारपासून (26 ऑगस्ट) जळगाव ते मुंबई, जळगाव ते अहमदाबाद अशी तिकीट विक्री सुरू झाल्याची माहितीही देण्यात आली. 

जळगाव-पुणे सेवा लवकरच! 
विमानसेवा प्राधिकरण सल्लागार समितीचे अध्यक्ष- खासदार उन्मेष पाटील म्हणाले, की जळगावचा विकास करावयाचा असल्यास विमानसेवेशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी मी संसदेत विमानसेवेचा मुद्दा मांडला अन्‌ विमानसेवेसाठी आवश्‍यक सर्व परवानगी संबंधित विभागाने दिल्या. त्यामुळे येत्या 1 सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू होईल. पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते विमानसेवेचा प्रारंभ करू. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील. जळगाव ते पूर्ण विमानसेवेबाबतही लवकरच निर्णय होईल. विमानाच्या नाइट लॅंडिंगबाबत 22 प्रकारच्या परवानगी लागतात. त्यापैकी 18 परवानगी मिळालेल्या आहेत. उर्वरित परवानगी मिळताच शेतमालाची आवक-जावकही विमानाने सुरू करता येईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com