शहरात आजपासून पाणीपुरवठा सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

जळगाव - रेमंड चौफुलीजवळ एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील ‘वाघूर’च्या मुख्य जलवाहिनीला महिनाभरापासून गळती लागली होती. गळती दुरुस्तीचे काम बुधवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी पाणीपुरवठा विभागातर्फे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. जलवाहिनीची पाच ठिकाणी दुरुस्ती, बाहेरून लोखंडी पाइपला वेल्डिंग तसेच शहरातील अन्य ठिकाणचे खराब व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम करण्यात आले असून, शहरात उद्या (४ ऑगस्ट) नियोजित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एस. खडके यांनी दिली.

गेल्या महिनाभरापासून रेमंड चौफुलीजवळील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर ‘वाघूर’च्या १५ मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली होती. याबाबत ‘सकाळ’ने ‘रेमंड चौफुलीजवळ पाण्याची नासाडी सुरूच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत आज महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे बुधवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी जलवाहिनी गळती दुरुस्तीच्या कामाला सुरवात करण्यात आली. आज दुपारपर्यंत जलवाहिनीचे पाच जॉइंट गळती तसेच बाहेरून लोखंडी पाइपची वेल्डिंग करून गळती बंद केली, तसेच शहरातील मेहरुण- भिलाटी, सिंधी कॉलनी येथील व्हॉल्व्हसह वाघूर पंपिंग स्टेशनमधील वीजमोटारची दुरुस्ती करण्यात आली.

Web Title: jalgaon news water

टॅग्स