जळगावकरांना मिळणार आता तीन दिवसांनंतर पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

जळगाव - महापालिकेच्या वाघूर पंपिंग स्टेशनमधील दोनपैकी एक ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाला आहे. दुरुस्तीसाठी पंधरा दिवस लागणार असल्याने एका ट्रान्स्फॉर्मरवर चार पंप चालविणे शक्‍य नाही. त्यामुळे शहरात कमी दाबाचा पाणीपुरवठा होत आहे. या ट्रान्स्फॉर्मरवर चार वीजमोटार सुरू केल्यास भार पडून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प होऊ शकतो. यामुळे शहरातील नियोजित दोन दिवसांऐवजी पाणीपुरवठा पंधरा दिवसांसाठी तीन दिवसांआड केला जाणार असल्याची माहिती महापौर ललित कोल्हे यांनी दिली.

जळगाव - महापालिकेच्या वाघूर पंपिंग स्टेशनमधील दोनपैकी एक ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाला आहे. दुरुस्तीसाठी पंधरा दिवस लागणार असल्याने एका ट्रान्स्फॉर्मरवर चार पंप चालविणे शक्‍य नाही. त्यामुळे शहरात कमी दाबाचा पाणीपुरवठा होत आहे. या ट्रान्स्फॉर्मरवर चार वीजमोटार सुरू केल्यास भार पडून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प होऊ शकतो. यामुळे शहरातील नियोजित दोन दिवसांऐवजी पाणीपुरवठा पंधरा दिवसांसाठी तीन दिवसांआड केला जाणार असल्याची माहिती महापौर ललित कोल्हे यांनी दिली.

पाणीपुरवठ्याबाबत आज महापौर, प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांची बैठक झाली. तीत पाणीपुरवठ्याबाबत उद्‌भवलेल्या समस्येची माहिती दिली. यात पर्यायी ट्रान्स्फॉर्मर खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ आदेश दिले. आतापर्यंत पाणीपुरवठ्याबाबत दोनच ट्रान्स्फॉर्मर  अवलंबून का राहिले, असा रोषदेखील पाणीपुरवठा विभागावर केला. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एस. खडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात २३ सप्टेंबरपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती दिली.

हातपंप, कूपनलिकापुनर्जीवित
शहरात उन्हाळ्यात पाण्याची समस्या उद्‌भवल्यास पुरवठ्याचे नियोजन आताच महापौर व जिल्हाधिकाऱ्यांनी आज बैठकीत केले. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या हातपंप व कूपनलिका दुरुस्ती करण्याची यंत्रणा दहा दिवसांसाठी मागितली असून, या यंत्रणेद्वारे शहरातील महापालिकेचे सर्व बंद हातपंप व कूपनलिका पुनर्जीवित केल्या जाणार आहेत, तसेच पावसाळ्यानंतर विहिरीदेखील स्वच्छ करून पुनर्जीवित केल्या जाणार असल्याचे बैठकीत ठरले.

असा असणार पाणीपुरवठा...
२३ सप्टेंबर - नटराज टाकी ते चौघुले मळा, शनिपेठ, बळिरामपेठ, नवीपेठ, हाउसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल- हुडको, भोईटेनगर, भिकमंचद जैननगर, जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्‍वर कॉलनी, वर्षा कॉलनी, तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉन्ड कॉलनी.

२४ सप्टेंबर - वाल्मीकनगर, काचंननगर, दिनकरनगर, असोदा रोड व परिसर, शिवाजीनगर- हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी महाविद्यालय परिसर, सुप्रिम कॉलनी परिसर.

२५ सप्टेंबर - रामेश्‍वर कॉलनी, एम. डी. एस. कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्‍सानगर, शांतीनगर, गृहकुल कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजिंठा सोसायटी, मोहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकरनगर, मानराज पार्क, असावानगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी, खोटेनगर, योगेश्‍वरनगर, हिरा पाइप व शंकररावनगर, खेडी गाव परिसर, तांबापुरा, श्‍यामा फायरसमोरील परिसर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर आदी भाग, जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर क्‍लब टाकी.

२६ सप्टेंबर - पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा- हुडको, सेंट्रल बॅंक कॉलनी, आशाबाबानगर, शिंदेनगर, अष्टभुजानगर, वाटिकाश्रम परिसर, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी परिसर, नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर, साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिव कॉलनी, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसर, मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इक्‍बाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर.

Web Title: jalgaon news water supply after 3 days