गॅसच्या भडक्‍यात दोन महिलांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

वाकोद, (ता. जामनेर) - घरातील गॅस पेटविल्यानंतर त्याचा अचानक भडका होऊन दोन महिलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. स्फोट झाल्यानंतर दोन्ही महिला 80 टक्के भाजल्या होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रात्री दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. सुरेखा गजानन दाभाडे व गयाबाई देशमुख अशी या महिलांची नावे आहेत. 

प्राप्त माहितीनुसार सायंकाळी चहा करीत असताना सुरवातीला गयाबाई केशव देशमुख या गॅसच्या भडक्‍यात आल्या. एकाएकी जाळ झाल्याने सुरेखा दाभाडे या गयाबाई देशमुख यांना वाचविण्यासाठी गेल्या असता त्याही आगीच्या भडक्‍यात गंभीररीत्या भाजल्या गेल्या. त्यावेळी तेथील रंगनाथ लोहार यांनी मोठ्या धाडसाने घरातून सिलिंडर घराबाहेर फेकले. 

"जैन' चे कर्मचारी आले धावून 
या घटनेची माहिती मिळताच जवळच असलेले जैन फार्म येथील कर्मचारी घटनास्थळी गॅसरोधक सिलिंडर घेऊन आले. घटनास्थळी त्यांनी तत्काळ फवारणी केल्याने आग आटोक्‍यात आली. त्यासोबतच जामनेर नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दखल झाली. त्यामध्ये राजू सोनार, विनोद गोपाळ, गणेश बोरसे, स्वप्नील पाटील यांनी गॅस सिलिंडर लांब नेऊन त्याला निकामी केले. तत्पूर्वी आग आटोक्‍यात आली होती. 

आगीत भाजल्या गेलेल्या दोन्ही महिलांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दखल केले होते. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासणीअंती दोघींना जळगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला. पहूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, नितीन सपकाळ, अतुल तडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

Web Title: jalgaon news women