वाढीव भागांत कामे होणे गरजेचे - ज्योती इंगळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

जळगाव - महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विकासकामांसाठी मिळालेल्या निधीचे योग्य नियोजन केले होते. या निधीच्या यादीमध्ये शहरातील वाढीव वस्त्यांच्या मूलभूत सुविधांचा विचार करून नियोजन केले. परंतु या यादीवर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने पुन्हा तिढा निर्माण झाला आहे. या निधीतून वाढीव भागांत गटारी, पथदिवे होणे खरेच गरजेचे असल्याचे मत स्थायी सभापती ज्योती इंगळे यांनी व्यक्त केले. 

शहराच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या २५ कोटींच्या निधीतील कामांचे वर्षभरापासून नियोजन झाले नव्हते. पालकमंत्री, आमदार, महापौर, उपमहापौर यांच्या बैठकीनंतर निधीतील कामांची यादी ठरवून शहरासह वाढीव भागामध्येही गटारी, पथदिवे आदी कामांचा या यादीत समावेश केला. परंतु भाजपच्या नगरसेवकांनी पुन्हा या यादीवर आक्षेप घेऊन यादीत समावेश केलेल्या कामांवर प्रश्‍न निर्माण केल्याने निधी खर्चाचा प्रश्‍न प्रलंबित पडला आहे. परंतु या निधीतून वाढीव भागातील मूलभूत सुविधा होणे गरजेचे असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न यामुळे मोठ्या प्रमाणात सुटणार आहे, असे सभापती इंगळे यांनी सांगितले.

स्वार्थासाठी कामे यादीत घेतली नाही
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटींच्या विकासकामांच्या यादीत समाविष्ट केलेली कामे कोणीच स्वार्थासाठी घेतली नाही. शहरात अनेक ठिकाणी 

गटारांअभावी नागरिक त्रस्त
शहरातील वाढीव भागांमध्ये रस्ते, गटारी, पथदिवे नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यात गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यांवर, मोकळ्या जागेत साचल्याने दलदल, डासांचा उपद्रव व गवत वाढत आहे. त्यामुळे साथरोगांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त होत आहेत. त्यामुळे २५ कोटींतील १० कोटींच्या गटारीच्या कामांमध्ये वाढीव भागातील गटारीची कामे घेतली होती.

Web Title: jalgaon news Work should be done in more areas