सामाजिक बांधिलकी जपत सुजाण नागरिक बना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

जळगाव - गणेशोत्सवादरम्यान शहरात पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर काम करताना विद्यार्थ्यांनी पोलिसांचे कर्तव्य काय असते हे समजून घ्यावे. याकाळात सामाजिक बांधिलकी जपत समाजातील नागरिकांचे गुण, अवगुण निरखून बघावे व एक सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा. या काळात विद्यार्थ्यांना चांगले व वाईट असे दोन्ही स्वरूपाचे अनुभव येतील, मात्र त्यातून चांगलेच शिकायला मिळेल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केला.

‘सकाळ’ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व जिल्हा पोलिस दल यांच्यातर्फे गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीचे नियमन या उपक्रमाचा प्रारंभ आजपासून झाला, त्याप्रसंगी श्री. कराळे बोलत होते. नेहरू चौक मित्रमंडळाच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमास अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे, ‘सकाळ’चे निवासी संपादक विजय बुवा, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोसे, प्रदीप ठाकूर, ‘यिन’चे समन्वयक अंकुश सोनवणे आदी उपस्थित होते.

श्री. कराळे म्हणाले, की गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी, वाहतुकीची कोंडी व त्याचे नियमन करण्यासाठी काय व्यवस्थापन करावे लागते, याचा अनुभव विद्यार्थ्यांना येणार असून तो भावी आयुष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल. 

‘सकाळ’चे निवासी संपादक  विजय बुवा यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे व त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. हा उपक्रम केवळ नागरिकांना शिस्तीत उभे करण्याचा अथवा सुरक्षित पुढे पाठविण्यापुरता मर्यादित नाही, तर तो आपण स्वत: भक्कमपणे उभे राहात समाजातील इतरांना पुढे घेऊन जाण्याची, त्यांची वाट सुकर करण्याची शिकवण देणारा आहे, असे श्री. बुवा यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांमधून विजय पाटील याने आपले मनोगत व्यक्त करताना पोलिसांचे खरे काम काय असते, याची जाणीव आता आम्हाला होत असल्याचे सांगितले. याठिकाणी काम करून आम्ही ज्ञानाची मोठी शिदोरी घरी घेऊन जाणार असल्याचेही त्याने सांगितले. सायली जाधव हिने प्रास्ताविकात या उपक्रमाबाबत माहिती दिली.

सहकारी पोलिसाचा वाढदिवस साजरा
कार्यक्रमाच्या सुरवातीला पोलिस अधीक्षकांचे आरटीसीपी प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांतर्फे केक कापण्यात आला. पोलिसांचे कामच असे असते की त्यांना सणवार अथवा वाढदिवस हा कधीच साजरा करायला मिळत नाही. त्यामुळे आज मान्यवरांच्या उपस्थित त्यांच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. 

Web Title: jalgaon news YIN