जळगावातील गाळेधारकांचे आंदोलन मागे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

जळगाव महापालिका व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी आपल्या मागण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून आंदोलन सुरू केले होते. आजच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमडळात या गाळेधारकांच्या प्रश्‍नावर निवेदन करतांना, गाळे कराराबाबत अधिनियमात लवकर बदल करण्यात येईल असे आश्‍वासन दिले होते.

जळगाव - गाळे लिलाव रद्द करावा, कराराची मुदत तीस वर्षे करावी या मागणीसाठी जळगाव महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी गेल्या तीन दिवसापासून सुरू केलेले आंदोलन आज मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले. 

जळगाव महापालिका व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी आपल्या मागण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून आंदोलन सुरू केले होते. आजच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमडळात या गाळेधारकांच्या प्रश्‍नावर निवेदन करतांना, गाळे कराराबाबत अधिनियमात लवकर बदल करण्यात येईल असे आश्‍वासन दिले होते. परंतु त्यानंतरही गाळेधारकांनी आज बेमुदत उपोषण सुरूच ठेवले होते. मात्र आज दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे यांनी दूरध्वनी केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी गाळेधारकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. यानंतरही 30 मार्चला मुख्यमंत्री जळगावात येत आहे. त्या दिवशीही गाळेधारकांच्या शिष्टमंडळाशी भेट घेण्याचे त्यांनी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचे आव्हाण त्यांनी केले असल्याचे सांगितले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी गाळेधारकांना मुख्यमंत्र्याच्या संदेशाची माहिती दिल्यानंतर गाळेधारकांनी आज दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर यांच्या हस्ते निबूं सरबत उपोषणाची सांगता केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यानीही आश्‍वासन दिले कि, गाळेधारकांना कोणीही त्रास देणार नाही. याबाबत आपण लक्ष देणार आहोत. गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणाही यावेळी केली

Web Title: jalgaon protest against corporation called off