रस्तेविकास... छे, नुसताच धुरळा! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

रस्ते म्हणजे जीवनवाहिन्या. कुठल्याही गावाचा अथवा शहराचा विकास हा तेथील रस्त्यांवर अवलंबून असतो. रस्ते चांगले असतील, तर त्या परिसराचा विकास जलद गतीने होतो. जळगाव जिल्ह्यात मात्र याच "जीवनवाहिन्या' वाहनधारकांसाठी जीवघेण्या ठरू लागल्या आहेत. जळगावसह जिल्ह्यात सुमारे 10 हजार 78 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा, राज्यमार्ग, आंतरजिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते यांचा समावेश आहे. यातील सुमारे चार हजार किलोमीटरच्या रस्त्यांची पावसाने दैना झाली आहे. यामुळे अपघात होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.

रस्ते म्हणजे जीवनवाहिन्या. कुठल्याही गावाचा अथवा शहराचा विकास हा तेथील रस्त्यांवर अवलंबून असतो. रस्ते चांगले असतील, तर त्या परिसराचा विकास जलद गतीने होतो. जळगाव जिल्ह्यात मात्र याच "जीवनवाहिन्या' वाहनधारकांसाठी जीवघेण्या ठरू लागल्या आहेत. जळगावसह जिल्ह्यात सुमारे 10 हजार 78 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा, राज्यमार्ग, आंतरजिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते यांचा समावेश आहे. यातील सुमारे चार हजार किलोमीटरच्या रस्त्यांची पावसाने दैना झाली आहे. यामुळे अपघात होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच वाहनांचे टायर फुटणे, चालकांना विविध व्याधी जडणे, अशा गंभीर समस्या उद्‌भवू लागल्या आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रही ठप्प झाले आहे... 

Image may contain: one or more people, sky, outdoor and nature
 
औरंगाबाद रस्त्याची लागली "वाट' 
जळगाव जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. जळगावपासून जवळच अजिंठा हे ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. मात्र, या मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या वर्षभरापासून बंद आहे. महामार्ग खोदून ठेवल्याने औरंगाबाद ते जळगाव असे सुमारे दीडशे किलोमीटरचे अंतर पार करण्यास चारऐवजी तब्बल सहा ते सात तासांचा अवधी लागतो. वाहन या मार्गावरून जाऊ शकत नाही, अशी स्थिती असल्याने अजिंठा पर्यटनस्थळाकडे परदेशी पर्यटकांनी गेल्या वर्षभरापासून पाठ फिरविली आहे. 
 

Image may contain: sky, outdoor and nature
महामार्गाचे चौपदरीकरण कधी? 
सोबत चिखली ते तरसोद मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ज्या मार्गावरून वाहतूक सुरू आहे, ती एकाच बाजूने होत आहे. या रस्त्याची अनेक ठिकाणी अक्षरशः चाळण झाली आहे. जळगाव ते धुळे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सोबतच ग्रामीण भागात जाणारे, शहरी व ग्रामीण भाग जोडणाऱ्या रस्त्यांवरही खड्डे निर्माण झाल्याने राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बस, खासगी ट्रॅव्हल्स, दुचाकी, चारचाकीसह इतर वाहने नादुरुस्त होणे, वाहनांचे स्पेअर पार्ट तुटून अपघात होणे, खड्डे चुकविताना वाहनांना अपघात जाऊन आतापर्यंत सुमारे 30 ते 35 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर केव्हा अपघात होईल, हे सांगता येत नाही, अशी स्थिती आहे. 

Image may contain: outdoor

वाहन दुरुस्ती खर्चात वाढ 
खराब रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहन दुरुस्तीच्या खर्चात वाढ झाली आहे. चालक योग्य पद्धतीने वाहने चालवितात. मात्र, रस्तेच एवढे खराब आहेत, की वाहनांवर "मेंटेनन्स' करावाच लागतो, अशी माहिती "इक्‍बाल गॅरेज'चे संचालक फिरोज शेख यांनी दिली. दुचाकीच्या पंक्‍चरचा खर्च पन्नास, तर चारचाकीचा दोनशे रुपयांपर्यंत येतो. शॉकअप तुटले, की एक हजार ते दोन हजारांचा खर्च करावाच लागतो. जळगावला एमआयडीसी आहे. मात्र, रस्त्यांच्या दुर्दशेमुळे तयार माल इतरत्र पोचविणे, कच्चा माल आणताना जादा भाडे कंपनीला द्यावे लागते. रस्ते कसे आहेत, यावरून त्या शहराचा, गावाचा, जिल्ह्याचा विकास कसा होत असेल, याची कल्पना येते. जिल्ह्यात निम्म्या रस्त्यांची चाळण झाल्याने "विकास'ही खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. औरंगाबाद मार्गाचे चौपदरीकरण मक्तेदार काम सोडून गेल्याने ठप्प झाले. आता ते तीन उपकंत्राटदारांकडून करून घेण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या असून, काम सुरू झाले आहे. जळगाव- पाचोरा- भडगाव रस्त्याचे कामही 60 टक्के झाले आहे. फागणे- तरसोददरम्यानच्या टप्प्यातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम तातडीने गतिमान करावे, अशा सूचना गेल्याच आठवड्यात दिल्या असून, जळगाव शहरातील महामार्ग चौपदरीकरणाबाबतही सूचना दिल्या आहेत. गेल्या दीड- दोन वर्षांपासून वाहनचालकांना रस्त्यांमुळे त्रास होत असून, आगामी काळात हे सर्व रस्ते पूर्ण होऊन दिलासा मिळेल. 

- उन्मेष पाटील, खासदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon road devlopment stop damage road