शिवाजीनगरातील रेल्वेगेट केव्हा उघडणार? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

जळगाव : रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगरातील रहिवाशांना रेल्वे जिना वापरण्याची मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात मात्र नागरिकांचा मूळ रस्ता बंद करून त्यांना अरुंद रस्ता दिला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नवीन रस्त्यावरील गेट मात्र बंद केले आहे. ते त्वरित उघडावे, अशी मागणी नगरसेविका गायत्री शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 

जळगाव : रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगरातील रहिवाशांना रेल्वे जिना वापरण्याची मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात मात्र नागरिकांचा मूळ रस्ता बंद करून त्यांना अरुंद रस्ता दिला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नवीन रस्त्यावरील गेट मात्र बंद केले आहे. ते त्वरित उघडावे, अशी मागणी नगरसेविका गायत्री शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 

शिवाजीनगर रेल्वेपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी रेल्वे जिन्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे या जिन्यावरून वर्दळ वाढली आहे. अशा स्थितीत रेल्वे प्रशासनाने मात्र या जिन्यावरून जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून असलेला रस्ता सिमेंट कॉंक्रिटची भिंत उभारून बंद केला आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी अरुंद जागा ठेवण्यात आली आहे. त्यातून ये-जा करणेही कठीण व त्रासदायक ठरत आहे. 

Image may contain: one or more people and outdoor

धोकादायक मार्ग 
जनतेसाठी रेल्वे प्रशासनाने ठेवलेला मार्ग धोकादायक आहे. तेथेच रेल्वे प्रशासनाचे नवीन जिना उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचे मोठमोठे साहित्य तेथे ठेवले आहे, तसेच वेल्डिंगचे कामही सुरू आहे. अशा स्थितीत प्रवासी व नागरिकही तेथून ये-जा करीत असतात. त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्‍यता आहे.

 Image may contain: outdoor

नवीन मार्गाचे गेट उघडावे 
रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी नवीन जिना उभारला आहे. तेथे ये-जा करण्यासाठी नवीन मार्गही तयार केला आहे. मात्र, या मार्गाचे गेट सद्यःस्थितीत बंद करण्यात आले आहे. जर हे गेट उघडले, तर प्रवासी व नागरिकांनाही ये-जा करता येईल. शिवाय, रेल्वे प्रशासनातर्फे नवीन जिना उभारण्याच्या सुरू असलेल्या कामातही अडथळा होणार नाही. त्यामुळे हे गेट त्वरित उघडावे, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली असून, याबाबत स्टेशन प्रबंधकांना निवेदनही देण्यात आले आहे. 

Image may contain: plant, tree and outdoor

शिवाजीनगरातून जिन्यावर जाण्यासाठी रेल्वेने नवीन मार्ग तयार केला आहे. मग, वापरासाठी अरुंद मार्ग का देण्यात आला? तेथे अपघाताचाही धोका आहे. त्यामुळे नवीन मार्गावरील गेट त्वरित उघडावे. 

- गायत्री उत्तम शिंदे, नगरसेविका, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon shivaji nagar railway brige work rialway gate close