जळगावात उद्यापासून पुन्हा शॉपिंगची पर्वणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

जळगाव - खरेदीसाठी पर्वणी ठरणारा शॉपिंग उत्सव आणि फूड फेस्टिव्हलचा आनंद "सकाळ' पुन्हा एकदा उत्सवांची धमाल घेऊन येत आहे. शहरातील शिवतीर्थ मैदानावर जळगावकरांना हा उत्सव 11 ते 16 जानेवारीदरम्यान अनुभवता येणार आहे. शॉपिंग उत्सवातील स्टॉल बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 

जळगाव - खरेदीसाठी पर्वणी ठरणारा शॉपिंग उत्सव आणि फूड फेस्टिव्हलचा आनंद "सकाळ' पुन्हा एकदा उत्सवांची धमाल घेऊन येत आहे. शहरातील शिवतीर्थ मैदानावर जळगावकरांना हा उत्सव 11 ते 16 जानेवारीदरम्यान अनुभवता येणार आहे. शॉपिंग उत्सवातील स्टॉल बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 

"सकाळ माध्यम समूहा'तर्फे "महा-एक्‍सपो-2017'मध्ये नागरिक गृहोपयोगी वस्तूंची शॉपिंग करण्यासोबतच ऑटो एक्‍स्पो आणि फूड फेस्टिव्हलची महामेजवानी मिळणार आहे. एकाच छताखाली गृहोपयोगी वस्तू आणि चारचाकी वाहनांचे ऑटो एक्‍स्पो हे जळगावकरांसाठी एक आकर्षणाचे केंद्र ठरत असते. वर्षातून दोन वेळा भरविण्यात येणाऱ्या महाउत्सवास जळगावकरांचाही तितकाच प्रतिसाद मिळत असतो. आगळ्यावेगळ्या प्रदर्शनासोबतच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव चाखायला देणारा फूड फेस्टिव्हलचा आनंदही घेता येणार आहे. शिवतीर्थ मैदानावर 11 ते 16 जानेवारीदरम्यान हा उत्सव भरविण्यात येत असून, त्याचे मुख्य प्रायोजक सातपुडा ऑटोमोबाइल्स आणि श्रीराम स्नॅक्‍स असून, सहप्रायोजक आदित्य होंडा आहे. तसेच इव्हेंट पार्टनर कन्सेप्ट ग्रुप आहे. 

दुचाकी, चारचाकी वाहनांचे प्रदर्शन 

गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसोबत ग्राहकांना दुचाकी व चारचाकी गाड्यांची नवीन मालिकांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. आगळेवेगळे अशा "ऑटो एक्‍स्पो' प्रदर्शनही बुधवारपासून (11 जानेवारी) खुले होत आहे. यात विविध प्रकारची दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्राहकांना पाहण्यास उपलब्ध असतील. शिवाय वाहन पसंतीस ठरल्यास तेथेच बुकिंगही करता येईल. या उत्सवासाठी स्टॉल बुकिंग सुरू आहे. 

"एनआयई'तर्फे "महा-डान्स धमाका' 
"महा-एक्‍स्पो-2017'मध्ये खास लहान मुलांसाठी "सकाळ-एनआयई'तर्फे 11 व 12 जानेवारीला डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात मुलांना मनपसंत गाण्यावर सोलो डान्स, ग्रुप डान्स, कपल डान्स, लावणी, मराठी नृत्य सादर करता येतील. तीन वयोगटांत स्पर्धा होईल. यात प्रथम गट ः 3 ते 5 वर्षे, द्वितीय ः 6 ते 10 वर्षे, तर तृतीय गट ः 11 ते 15 वर्षे असे गट आहेत. सोलो डान्ससाठी शंभर रुपये, कपल डान्स- दीडशे, तर ग्रुप डान्ससाठी दोनशे रुपये प्रवेश फी आकारली जाईल. स्पर्धेतील तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील, तर अन्य सर्वांना सहभाग प्रमाणपत्र व बक्षीस दिले जाईल.

Web Title: Jalgaon shopping fun again from tomorrow