श्रीराम चरणी मस्तक...रामनामाचा घोषात रथोत्सव रंगला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

जळगाव : प्रभू श्रीरामाच्या नावाचा जयघोष... फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव... भजनात दंग झालेले भाविक...लेझीम व काठ्यांची प्रात्यक्षिके दाखविणारे तरुण...मनोरे उभे करणारे कार्यकर्ते...फटाक्‍यांची आतषबाजी, रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या...लहान मुलांना जवळ घेऊन आशीर्वाद देणारी सोंगे...असे भक्तिपूर्ण चित्र आज शहरातील विविध मार्गावर दिसून आले. निमित्त होते श्रीराम मंदिर संस्थानाच्या रथोत्सवाचे. 

 

जळगाव : प्रभू श्रीरामाच्या नावाचा जयघोष... फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव... भजनात दंग झालेले भाविक...लेझीम व काठ्यांची प्रात्यक्षिके दाखविणारे तरुण...मनोरे उभे करणारे कार्यकर्ते...फटाक्‍यांची आतषबाजी, रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या...लहान मुलांना जवळ घेऊन आशीर्वाद देणारी सोंगे...असे भक्तिपूर्ण चित्र आज शहरातील विविध मार्गावर दिसून आले. निमित्त होते श्रीराम मंदिर संस्थानाच्या रथोत्सवाचे. 

 

Image may contain: 2 people, people standing and outdoor
जळगावचे ग्रामदैवत असलेल्या श्रीरामाच्या रथाच्या मिरवणुकीस दुपारी बाराच्या सुमारास उत्साहात सुरवात झाली. एकूण 147 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या रथोत्सवानिमित्त जिल्हाभरातून आलेल्या भाविकांनी शहरात जणू भक्तीचा मळा फुलला होता. रथाच्या मार्गावर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, रथावर होत असलेला पाकळ्यांचा वर्षाव, ठिकठिकाणी होत असलेले औक्षण यामुळे चैतन्यपर्व अवतरले होते. रथोत्सवाचे संस्थापक तथा योगीपुरूष अप्पा महाराज, खानदेशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमा असलेले ट्रॅक्‍टर, लहान-लहान रथ ओढणारे बाल भाविक, संत मुक्ताईची पालखी, पगडी घातलेले व दंड हातात घेतलेले भालदार-चोपदार, मोरपंख मागे लावलेले सोंग घेतलेले भाविक, विविध प्रात्यक्षिके दाखविणारे अश्‍व आदींमुळे रथोत्सवाची रंगत वाढली. 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157137409721973&id=55436896972

 

 

Image may contain: 16 people, including Rahul Suryawanshi, people sitting, people eating, table and food
मंत्रोच्चारात महापूजा 
सकाळी साडेअकराला श्रीराम मंदिर संस्थानच्या प्रांगणात संस्थानचे प्रमुख विश्‍वस्त मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते आणि शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळीच्या वेद मंत्राच्या घोषात पूजेस प्रारंभ झाला. प्रारंभी शांतीपाठ, गणेश गरुड, मारुती देवता पूजन, रथचक्र पूजन, रथास कोहळे आदी फळे अर्पण करून प्रभू श्रीरामाच्या रथाची महापूजा होऊन सुरवात झाली. दुपारी बाराला रथाची महाआरती झाली. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, महापौर सिमा भोळे, आयुक्‍त डॉ. उदय टेकाळे, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, पोलिस पाटील प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते. यानंतर दुपारी एकला रथ मिरवणुकीस सुरवात झाली. 

Image may contain: 15 people, people smiling, people standing and outdoor

चिमुकल्यांचाही रथ 
ेसनई, चौघडाचा निनादात ग्रामनगरीतून काढण्यात आलेला मुख्य श्रीराम रथोत्सवात भाविकांचा उत्साह वाढत होता. यासोबतच चिमुकल्यांच्या रथाचे एक वेगळे आकर्षण उत्सवात पाहण्यास मिळत होते. अग्रभागी सनई- चौघडा गाडी, वाद्यवादन पथके, भजनीमंडळ, श्री संत मुक्ताबाई पालखी व त्यांच्या मागे श्रीरामाचा रथ होता. श्री संत मुक्‍ताबाई पालखीच्या पुढे चिमुकल्यांचा रथ चालत होता. काही चिमुकले रथ ओढत होते, तर काही जण चाकांना मोगरी लावण्याचे काम करत होते. त्यावरही फुलांची उधळण करत रथ ओढण्याची मजा चिमुकले घेत होते. 

Image may contain: 2 people, outdoor

क्षणचित्र 
- 147 वर्षांची अखंड परंपरा 
- सोंगांनी केलेल्या वेशभूषेचे रथोत्सवात आकर्षण 
- रामनामात दुपारी एकला रथोत्सवास सुरवात 
- लेझीमपथकांचे कलादर्शन 
- बालगोपालांनाही ओढला रथ 
- रथावर पुष्पवृष्टी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon sriram rath utsav kartik ekadashi