जि.प. अध्यक्ष निवडीपुर्वीच सत्ताधारी भाजपत फुट; निधी वाटपात डावलले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

जळगाव ः राज्यात भाजप- शिवसेवा युती तुटून नवीन महाशिवआघाडी निर्माण होण्याचे चित्र आहे. त्याच पार्श्‍वभुमीवर जळगाव जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सदस्य एकत्र येवून भाजपच्या नाराज सदस्यांना दूर ठेवण्याची शक्‍यता आहे. याचेच चित्र आज पाहण्यास मिळाले असून, जि.प. अध्यक्ष निवडीसाठी 19 नोव्हेंबरला आरक्षण निघत असून अध्यक्ष निवडीचे आरक्षण निघण्यापुर्वीच सत्ताधारी भाजपच्या सदस्यांमध्ये फुट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

जिल्हा परिषदेच्या सेसफंडासह नागरीसुविधा, तिर्थक्षेत्र विकास, जनसुविधा या हेडखाली प्राप्त झालेल्या दहा कोटी निधीचे परस्पर वाटप करण्याचे काम अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या अधिकारातून झाले आहे. यामध्ये अध्यक्षासह, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सर्व सभापती, गटनेते, स्थायी समिती आणि आवाज उठविणारे सदस्य असे 17 सदस्यांनाच निधी देण्यात आला आहे. हा निधी देताना राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेसह सत्ताधारी भाजपच्या काही सदस्यांना डावलण्यात आला आहे. त्यांना एक रूपयाचा देखील निधी देण्यात आला नसल्याने या सदस्यांची नाराजी आहे. याबाबत आक्रमक भुमिका घेवून आजच्या स्थायी समिती सभा सुरू असताना सभागृहात जावून आवाज उठविला. अर्थात जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण निघण्यापुर्वीच भाजप सदस्यांमध्ये फुट पडल्याचे आज पाहण्यास मिळाले. 

गटनेते तात्यांना घेराव 
निधी न मिळाल्याने नाराज असलेल्या भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. अध्यक्षांना अधिकार दिल्यानंतर सदस्यांचा विश्‍वासघात करण्यात आला. याबाबत स्थायी समितीच्या सभेत जावून पदाधिकारी व अधिकाऱ्यांना बाबत विचारणा केली. तत्पुर्वी स्थायी समितीच्या सभेला जात असलेले जिल्हा परिषद भाजपचे गटनेते तथा शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे यांना भाजपच्या सदस्यांनी घेराव घालत सभागृहात जाण्यापासून रोखले. यानंतर सभापती देखील सभागृहात प्रवेश न करताच परतले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon zilha parishad bjp member nidhi not allowed