तुम्हीही म्हणा "मी पुन्हा येईन...' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पंधरा दिवसांनी अध्यक्ष निवडीनंतर सर्व पदाधिकारी बदलणार असल्याने यात उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना तुम्हीही म्हणा "मी पुन्हा येईन..' 

जळगाव : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार बसले असून, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली. परंतु यापुर्वी झालेल्या सर्व घडामोडींवर जि.प.च्या सभेत सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्यांनी एकमेकांना टोलोबाजी केली. पंधरा दिवसांनी अध्यक्ष निवडीनंतर सर्व पदाधिकारी बदलणार असल्याने यात उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना तुम्हीही म्हणा "मी पुन्हा येईन..' असे सांगून आले तरी स्वागत राहिले म्हणून सांगितले. 
जिल्हा परिषदेची आज झालेल्या सर्वसाधारण सभेत राज्यातील घडामोडींवर रंगतदार चर्चा झाली. यात विरोधक व सत्ताधारीत सदस्यांनी एकमेकांना टोले दिले. यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेत भाजपला पाठींबा देवून सत्तेत असेलल्या कॉंग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांना शिवसेनेच्या रावसाहेब पाटील यांनी राज्यात सोबत आल्याने आता आमच्या गटात सहभागी होण्याचे सांगितले. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. तसेच सुरवातीला मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचा अभिनंदनाचा ठराव रावसाहेब पाटील यांनी मांडला. तर रवींद्र पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. 

उपाध्यक्षांना "मी पुन्हा येईन...' 
जि.प.चे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सर्वसाधारण सभा चांगल्याप्रकारे हाताळली. तसेच सर्व सदस्यांना सांभाळून घेतल्याने त्यांच्या कामाबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावरूनच विरोध पक्षातील नानाभाऊ महाजन, रावसाहेब पाटील यांनी तुम्हीही म्हणा मी पुन्हा येईन...हे आम्हाला चालेल असे म्हटले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon zilha parishad sabha vice precident punha yein