जिल्हा परिषदेत चव्हाण की अन्य कोण बसणार अध्यक्षपदावर! 

जिल्हा परिषदेत चव्हाण की अन्य कोण बसणार अध्यक्षपदावर! 

जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्षांची आरक्षणे जाहीर झाली असून, सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर महिलाराज येत आहे. त्यानुसार सत्ताधारी भाजपच्या दोन सदस्यांची नावे अग्रस्थानी असली, तरी रजनी चव्हाण यांच्या नावाला विरोध होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी श्रीमती चव्हाण की अन्य महिला सदस्य विराजमान होतील; याबद्दल चर्चा रंगत आहे. 

जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, विधानसभा निवडणुकीत मुदतवाढ देण्यात आली. यानंतर अध्यक्षपद निवडीसाठीचे आरक्षण निघून महिला उलटला. निवड प्रक्रियेचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. गेल्यावेळी जिल्हा परिषदेसाठी ओबीसी महिला राखीव असे आरक्षण निघाल्याने उज्ज्वला पाटील यांना संधी मिळाली होती. यानंतर पुन्हा एकदा सर्वसाधारण महिला राखीव करण्यात आले आहेत. या पदासाठी फत्तेपूर- तोंडापूर गटातील सदस्या व महिला बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. यानंतर भाजपच्या पाल- केऱ्हाळा गटातील नंदा अमोल पाटील यांचेही नाव आघाडीवर आहे. अर्थात जळगाव लोकसभा मतदार संघातून अध्यक्ष दिल्याने आता रावेर लोकसभा मतदार संघातील सदस्यास अध्यक्ष पदाची संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. 

तर भाजप सदस्यांचाच विरोध 
सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने भाजपमधून दोन जणांचे नावे पुढे आहे. यात देखील जिल्हा परिषदेसाठी सलग तिसऱ्यांदा महिला आरक्षण निघाल्याने याबाबत शंका देखील व्यक्‍त केली जात आहे. जामनेर तालुक्‍याला पुन्हा एकदा अध्यक्षपद मिळवून देण्यासाठी हे आरक्षण काढण्यात आल्याचे देखील बोलले जात आहे. अशा स्थितीत अध्यक्षपदासाठी महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण यांचे नाव पुढे केले जात असेल; तर त्यास भाजपच्याच सदस्यांकडून विरोध दर्शविला जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे श्रीमती चव्हाण या चर्चेतील नावाशिवाय अन्य कोणी अध्यक्षाच्या खुर्चीवर विराजमान होणार हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

गट फुटण्याची भीती 
जिल्हा परिषदेवर गेल्या तीस वर्षांपासून भाजपचा झेंडा फडकत आहे. आता सत्ता बदलाची शक्‍यता वर्तविली जात असली तरी बहुमत मिळविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीला मोठी कसरत करावी लागणार आहे. तरी देखील भाजपच्या नाराज सदस्यांना सांभाळावे लागणार आहे. त्याचप्रमाणे चव्हाण यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्‍चित झाल्यास भाजपमधील एक गट फुटण्याची शक्‍यता अधिक आहे. ही सारी परिस्थिती भाजपला सांभाळून सत्ता टिकवावी लागणार आहे. असे न झाल्यास जिल्हा परिषदेत देखील महाविकास आघाडीची सत्ता बसण्याची शक्‍यता अधिक आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com