जळगाव जिल्हा परीषदेत भाजपची मुसंडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

33 जागा जिकून क्रमांक एकवर : राष्ट्रवादी क्रमांक दोनवर, सेना, कॉंग्रेसची पिछेहाट

33 जागा जिकून क्रमांक एकवर : राष्ट्रवादी क्रमांक दोनवर, सेना, कॉंग्रेसची पिछेहाट

जळगाव: जळगाव जिल्हा परिेषदेत गटात तब्बल 33 जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. बहुमतासाठी पक्षाला अवघे एक जागा कमी आहे. त्यामुळे जिल्हा
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी भाजप-सेना युती होणार कि भाजप एखाद्या पक्षाचा गट फोडून स्वबळावर सत्ता मिळविणार याकडेच लक्ष आहे. राष्ट्रवादी 16 जागा मिळवून कम्रांक दोनवर आहे.तर शिवसेनेला 14 व कॉंग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत. पंचायत समितीत भाजपने तब्बल 11 पंचायत समित्यावर आपला झेंडा फडकविला आहे. तर पाच ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीला एकाही पंचायत समितीवर सत्ता मिळविता आलेली नाही.

जिल्हा परिषदेच्या 67 जागासाठी झालेल्या निवडणूकीचा निकाल आज जाहिर झाला. यात भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली आहे. भाजपने तब्बल 33 जागा मिळविल्या आहे.गेल्या वेळी 24 जागा मिळाल्या होत्या यावेळी तब्बल 9 जागा जास्त मिळविल्या आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 16 जागा मिळवून क्रमांक दोनचा पक्ष असला तर त्यांच्या जागेत मोठी घसरण झाली आहे. गेल्यां वेळी त्यांना 20 जागा मिळाल्या होत्या.तब्बल 4 जागा त्यांनी गमावल्या आहेत. शिवसेनेला यावेळी सत्तेचा कोणताही फायदा मिळविता आलेला नाही. मात्र त्यांचे नुकसानही झालेले नाही गेल्यावेळेप्रमाणे यावेळेसही त्यांना 14 जागा मिळाल्या आहेत. तर कॉंग्रेसची मोठी पिछेहाट झाली असून केवळ चार जागा मिळाल्या आहेत. तब्बल दहा जागावरून त्यांची घसरण झाली आहे. सहा जागाचे त्यांना नुकसान झाले आहे.

भाजपला सत्तेसाठी हवा एक
भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळविण्याच्या काठावर पोहोचला आहे. त्यांना बहुमतासाठी केवळ एक जागा हवी आहे. त्यांचा परंपरागत मित्र शिवसेनेला 14 जागा मिळविल्या आहेत. मात्र त्यांच्याशी युती न करता फोडाफोडीचे राजकारण करून स्वबळावर सत्ता मिळविण्याची खेळी भाजप करण्याची शक्‍यता आहे. कॉग्रेंसला चार जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 16 जागा आहेत. पक्षांतर करावयाचे असल्यास निम्म्यापेक्षा अधिक सदस्य फुटल्यास पक्षातंर बंदीची कारवाई होवू शकत नाही. त्यामुळे भाजप कोणत्या पक्षाच्या सदस्यावर डाव टाकणार हे आगामी काळात दिसून येईल.

पंचायत समितीही भाजपच
पंचायत समितीतही भारतीय जनता पक्षानेच आघाडी घेतल्याचे चित्र आहे. 134 गणापैकी तब्बल 66 उमेदवार भाजपचे निवडून आले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 32 शिवसेनेचे26 तर कॉंग्रेसचे 6 आणि अपक्ष 4 निवडून आले आहेत. एकूण पंधरा पंचायत समितीपैकी भाजपकडे तब्बल 11 पंचायत समिती जाण्याची शक्‍यता आहे. तर चार पंचायत समिती शिवसेनेचा सभापती असणार आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची मात्र पूर्णपणे पिछेहाट झाली असून त्यांना एकही पंचायतीवर समितीवर सत्ता मिळण्याची शक्‍यता कमीच आहे.

Web Title: jalgaon zilla parishad result