गाळेधारकांना स्वच्छतेसाठी २४ तासांची मुदत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

जळगाव - फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटची शनिवारी (२२ जुलै) जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी पाहणी केली होती. त्यानुसार दंडाधिकारी जलज शर्मा यांनी फुले मार्केट बंद करण्याची नोटीस देऊन स्वच्छतेसाठी गाळेधारकांना दोन दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार मुदत संपल्यावर आज सायंकाळी सातला आयुक्तांनी स्वच्छतेची पाहणी केली. मात्र, संकुलाच्या संकुलातील बहुतांश भागांत मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून आला. त्यामुळे स्वच्छतेसाठी गाळेधारकांना आणखी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. स्वच्छता केली नाही तर मार्केट बंद करण्याचा इशारा यावेळी दिला.

जळगाव - फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटची शनिवारी (२२ जुलै) जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी पाहणी केली होती. त्यानुसार दंडाधिकारी जलज शर्मा यांनी फुले मार्केट बंद करण्याची नोटीस देऊन स्वच्छतेसाठी गाळेधारकांना दोन दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार मुदत संपल्यावर आज सायंकाळी सातला आयुक्तांनी स्वच्छतेची पाहणी केली. मात्र, संकुलाच्या संकुलातील बहुतांश भागांत मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून आला. त्यामुळे स्वच्छतेसाठी गाळेधारकांना आणखी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. स्वच्छता केली नाही तर मार्केट बंद करण्याचा इशारा यावेळी दिला. तसेच गोलाणी मार्केटच्या पाहणीनंतर आयुक्तांनी स्वच्छतेबद्दल समाधान व्यक्त केले.

स्वच्छता नियमित राहण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, डीवायएसपी सचिन सांगळे, सहाय्यक उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.   

२४ तासांत सर्व मार्केट स्वच्छ करा  
फुले मार्केटमध्ये सायंकाळी अचानक आयुक्त निंबाळकरांनी पाहणी केली असता अनेक ठिकाणी साचलेला कचरा दिसून आला. यात मार्केटच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने नाराजी व्यक्त करीत गाळेधारकांच्या प्रतिनिधिनीला या घाणीमुळे शहरात जर रोगराई पसरली तर तुम्हाला जबाबदार धरून कारवाई करू, असे सांगितले. तसेच त्यांना २४ तासांची मुदत देत उद्या (२६ जुलै) सायंकाळी पुन्हा पाहणी केली जाईल, असे सूचित केले. जर स्वच्छता नाही दिसली तर मार्केट बंदची करवाई करेल असे सांगितले. गाळेधारकांनी दुकानाबाहेर अतिक्रमण करू नये, रस्त्यातील सर्व बोर्ड, दोऱ्या काढा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी तंबीही दिली.  

हॉकर्सला दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’
फुले मार्केटनंतर आयुक्तांनी चौबे शाळा चौकात येऊन भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेत्यांना दोन दिवसांची मुदत द्या, त्यांना माहिती द्या, दिलेल्या जागेवर जरी हॉकर्स गेले नाही आणि बळिरामपेठ, सुभाष चौकात दुकाने लावल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, दोन वेळांमध्ये दोन पथक कायम बाजार ठेवून कारवाई करत रहा, अशा सूचना अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांना दिल्या. 

रिक्षा व अवजड वाहनांना बंदी करा
पाहणीत चौबे चौक ते सुभाष चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा अनुभव आयुक्तांना आला. शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले यांना बाजारात रिक्षांना प्रवेश बंद करण्याचा, तसेच दाणा बाजारात  दिवसा अवजड वाहने बंदी करून त्यांना रात्री येण्याची परवानगी द्यावी अशा सूचना केल्या.

जुन्या पालिकेच्या जागेवर पार्किंग करा
प्रभारी आयुक्तांनी गांधी मार्केटच्या बाजूला असलेल्या जुन्या नगरपालिकेच्या जागेवर ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याची सूचना केली. जागा त्वरित स्वच्छ करून फुले मार्केट व आजूबाजूच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात उपायुक्तांना सांगितले.   

गोलाणी मार्केटच्या स्वच्छतेवर समाधानी
फुले मार्केटच्या पाहणीपूर्वी आयुक्तांनी आधी गोलाणी मार्केटची पाहणी केली. पाहणीदरम्यान सर्व मजल्यांवर चांगली स्वच्छता दिसल्याने समाधान व्यक्त केले. तसेच किती गाळेधारकांनी निर्धारित केलेले स्वच्छता शुल्क दिले नाही, याबाबत व्यापारी असोसिएशनच्या श्री. टावरी यांना विचारणा केली. यावेळी २८० गाळेधारकांनी अजून पैसे नसल्याचे श्री. टावरी यांनी सांगितले. यावर आयुक्तांनी जर पैसे नाही दिले तर त्यांचे गाळे सील करू, असे सांगितले.  

मार्केट सुरक्षित नाही, गेट बसवा 
आयुक्तांना संकुलाच्या गच्चीवर सात आठ तरुण एक तासांपासून बसलेले महापालिकेच्या इमारतीमधून दिसून आले होते. गोलाणी पाहणी दरम्यान गच्चीवर गेले असता आयुक्तांनी तरुणांना तंबी दिली. तसेच महापालिका अधिकाऱ्यांना सुरक्षेसाठी गेट बसविण्याची सूचना केली. सर्व विंगच्या लिफ्ट सुरू करण्यासाठी किती खर्च येईल, याचा त्वरित अहवाल द्यावा, असे शहर अभियंता सुनील भोळे यांना सांगितले. 

अहो, ‘काकू’ उद्यापासून बसू नका...
सुभाष चौकात जात असताना रस्त्यात भाजी विक्री करीत असलेल्या महिलेला आयुक्तांनी अहो.. काकू उद्यापासून येथे भाजी विक्री करू नका, दिलेल्या जागेवर जा; अन्यथा कारवाई केली जाईल, अशी सूचना स्वत: आयुक्तांनी दिली. 

आयुक्तांनी पायी फिरून केली पाहणी
प्रभारी आयुक्त निंबाळकरांनी सलग दोन तास पायी फिरून फुले, गोलाणी संकुल तसेच परिसराची पाहणी केली. सुरवातीला त्यांनी गोलाणी मार्केटची पाहणी केली. त्यानंतर ते गाडी न घेताच पायी फुले मार्केटला गेले. तेथे त्यांनी संपूर्ण फुले मार्केट, तसेच बळिरामपेठ, दाणाबाजार आदी परिसरात पाहणी केली. 

Web Title: jalgav news 24 hrs. time for cleaning to shop owner

टॅग्स