वेतन आयोग लागू करा; अन्यथा संप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

‘इंटक’च्या विभागीय मेळाव्यात जयप्रकाश छाजेड यांचा इशारा  
जळगाव - एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करून वेतनवाढ द्यावी; अन्यथा संपावर जाऊ, असा इशारा महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या आज झालेल्या विभागीय मेळाव्यात अध्यक्ष तथा माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिला. 

महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचा आज विभागीय मेळावा झाला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, इंटक संघटनेचे सरचिटणीस डी. ए. लिपणे- पाटील, शहराध्यक्ष राधेश्‍याम चौधरी, बी. के. पाटील, प्रदीप देशमुख, राखी शर्मा, रजनी पाटील, भगतसिंग पाटील, नरेंद्र राजपूत आदींची उपस्थिती होती. 

छाजेड म्हणाले, की एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, वेतन निश्‍चिती, विविध भत्ते, सेवा - सवलतीसह प्रवर्गनिहाय शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतनाएवढेच वेतन एस. टी. कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे. याबाबत इंटकने भूमिका मांडली असून एस. टी. प्रशासनाने सातवा वेतन आयोग देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गुजरातमधील एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू असून महाराष्ट्रातील एस. टी. कर्मचाऱ्यांना का नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला. 

तुटपुंज्या पगारावर कर्मचारी काम करीत असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासन संवेदनशील नाही ही शोकांतिका असून जोपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होत नाही, तोपर्यंत आता माघार घेणार नसल्याचे छाजेड यांनी सांगितले. मेळाव्याला पदाधिकाऱ्यासह, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

Web Title: jalgav news Apply Pay Commission; Otherwise the strike