उपनिरीक्षक पिता आजारपणाच्या रजेवर, पोलिस मुलगा बेपत्ताच!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

जळगाव - जिल्हा पोलिस दलात कार्यरत उपनिरीक्षकाच्या पोलिस मुलाने नशेचे पान खाऊ घालून चोवीसवर्षीय तरुणीवर पोलिस मुख्यालयाच्या गेम्स रूमसह एस.टी. कॅन्टीनमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. पाच वर्षे जुने प्रेम प्रकरणातून बिनसल्यावर हा सर्व प्रकार समोर आला असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित पितापुत्राच्या अटकेसाठी पोलिसांची दमछाक होत आहे.  

शिवाजीनगर चौगुले प्लॉट भागातील रहिवासी २४ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस मुख्यालयात कार्यरत परवेज रईस शेख याने लग्नाचे आमिष दाखवत सलग पाच वर्षांपूर्वी  पिडीतेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. नंतर दोघांचे बिनसल्यावरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक रईस शेख व त्याचा मुलगा परवेझ यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होण्याच्या पूर्वीपासूनच पिता रईस शेख हा आजारपणाच्या रजेवर (सिकलिव्ह) असून गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुलगा परवेझ हा न सांगता घरातून निघून गेल्याची माहिती तपास पथकाला मिळाली आहे. 

उस्मानिया पार्क येथे वास्तव्यास असलेल्या या कुटुंबाच्या घराला कुलूप असून दोघा पिता-पुत्रांच्या शोधार्थ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न चालवले आहे. जळगाव जिल्ह्यातील तालुक्‍यांसह शेजारच्या जिल्ह्यातही संशयितांचा शोध सुरू आहे. दोघा पितापुत्रांचे मोबाईल बंद असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

पितापुत्रांचे निलंबन
उपनिरीक्षक रईस शेख मुख्यालयातील क्रीडा विभागाचे प्रमुख असून, मुलगा परवेझ शेख मुख्यालयात कार्यरत आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर तत्काळ प्रभावाने दोघांचे निलंबन करण्यात आले असून, खात्यांतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

Web Title: jalgav news crime