मृत्यूचा खेळ आता वेगळ्या नावांनी

मृत्यूचा खेळ आता वेगळ्या नावांनी

‘ब्ल्यू व्हेल’चे क्‍लोनिंग करून अनेक गेम उपलब्ध; भीतीची व्याप्ती वाढली

जळगाव - पौगंडावस्थेतील पाल्यांचे पालक, पोलिस, सुरक्षा यंत्रणांसह सायबरतज्ज्ञांच्या डोक्‍याला ताप ठरत असलेल्या ब्ल्यू व्हेल गेमची व्याप्ती वाढत चालली आहे. 

या जीवघेण्या गेमचा रशियातील मूळ निर्माता अटकेत असून, मूळ गेमचे क्‍लोनिंग करून आता वेगवेगळ्या तीन-चार नावांनी गेम सुरू झाल्याने भीतीचे परीघ वाढले आहे. ‘अ बिगनिंग द डेथ टास्क’, ‘अ सायलेंट हाऊस’, ‘वेक अप मी एट ४.२० ए एम’ आणि ‘अ सी ऑफ व्हेल्स’ अशा नावांनी हा मृत्यूचा खेळ उपलब्ध झाला आहे. दरम्यान, मुंबईनंतर थेट मृत्यूचा खेळ आता वेगळ्या नावांनी जामनेर तालुक्‍यातील पंधरावर्षीय मुलाची आत्महत्त्येचे प्रकरण समोर येऊन उलटसुलट भीतीदायक चर्चेला उधाण आले आहे. 

रशियात वर्ष २०१३मध्ये के. फिलिप बुडेकिन याने द ब्लू व्हेल गेम’ नावाने ॲण्ड्रॉईड सपोर्टवर चालणारा चॅलेंजिंग गेम लाँच केला. वर्ष २०१५ साली या गेमने पहिला बळी घेतला. जगभरात रोगासारखा पसरलेल्या या ‘ब्लू व्हेल’ या गेमने २०१५ -२०१६ या वर्षभरातच एकट्या रशियात १३० मुलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. मुंबईनंतर या गेमने थेट जळगाव जिल्ह्यात आणि थेट जामनेरच्या सवतखेड्या पर्यंतचा प्रवास केल्याच्या वृत्ताने सर्वदूर भीतीचे वातावरण पसरले आहे. 

जामनेर तालुक्‍यातील तरुण महानुभावपंथीय
सवतखेडा (जामनेर) येथील पंधरा वर्षीय शेतकरी पुत्राने गळफास लावून घेतल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी घडली होती.  कपिल (काल्पनिक नाव) अंत्यसंस्कारानंतर कुटुंबातील नातलगांनी घरात त्याच्या वह्या पुस्तकांत शोध घेतला. त्याच्या जवळ चायनाचा ॲण्ड्रॉईड मोबाईल आढळून आला होता. घडल्या प्रकाराची माध्यमांनी दखल घेतल्यावर जामनेर पोलिसांनी या प्रकरणाचा पिच्छा पुरवला. माधुरी बोरसे या महिला उपनिरीक्षकांसह डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी चौकशी केल्यावर मयत मुलगा महानुभावपंथीय असल्याचे समजले. हा तरुण ब्लू-व्हेल गेममुळे मृत झाला नसल्याचा पालकांचा दावा असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.

निगेटिव्ह थिंकिंगचे सावज..
हा गेम पौगंडावस्थेतील आणि खास करुन नैराश्‍यग्रस्त, निगेटिव्ह थिंकींगच्या विद्यार्थ्यांच्या शोधात असते. एकदा या गेममध्ये इंटर झाले की, गेमचा ट्रेनर टास्क पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करतो. टास्क ५० दिवसांत पूर्ण करायचे असतात. ‘अ सायलेंट हाऊस’, ‘अ सी ऑफ व्हेल्स’ आणि ‘वेक अप मी एट ४.२० ए एम’ असे या टास्कची नावं गेममध्ये ठेवण्यात आलेली होती. आता चक्क मूळ ‘द ब्लू-व्हेल’ या गेमचे क्‍लोनिंग होऊन खेळातील टास्कच्याच नावे हा मृत्यूचा खेळ खेळवणारे ॲण्ड्रॉईड गेम अवतरले आहेत.

व्हॉटस्‌ॲप, फेसबुक माध्यम 
काहीच दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर रशियन विद्यार्थ्यांनी फोटो टाकून गेम खेळण्यास सुरवात केल्यावर याची गंभीर दखल घेत इन्स्टाग्रामने लिंक बंद केली, आता इन्स्टाग्रामवर वॉर्निंगही येते. व्हॉटस्‌ॲप आणि फेसबुकवर मात्र पूर्णपणे या गेमच्या लिंकवर अद्यापही निर्बंध आलेले नाही. भारतासह जगभरात व्हॉटस्‌ॲप युजर सर्वाधिक असल्याने याचा धोका अधिक वाढला आहे. 

साइट बंद करणे शक्‍य..?
एखाद्या विद्यार्थ्याने कोणत्या लिंकवरून गेम शेअर केला आहे, ते कळल्यावर त्यास बंद करता येणे शक्‍य होते. मात्र अशा प्रकारचे गेम्स आणि सायबर गुन्हेगारांकडून लगेच वेगळ्या नावाने नव्या लिंक तयार करून पाठवल्या जातात. सद्यःस्थितीत ब्ल्यू व्हेल या गेमचे संगणक सनकीद्वारे क्‍लोनिंग करून नव्या नावाने गेम उतरवल्याने ते अधिक क्‍लिष्ट झाले आहे. एखादी घटना घडल्यानंतरच त्या लिंक समोर येतील, असेही सायबरतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com