मोकाट कुत्र्याने चिमुरड्याच्या गालाचा तोडला लचका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

गंभीर बाळाला घेऊन कुटुंबीय औरंगाबादकडे रवाना; कुत्र्याच्या हल्ल्यात नऊ जण जखमी; जिल्हा रुग्णालयात उपचार 

जळगाव - शहरातील शिवाजीनगरातील उस्मानिया पार्क परिसरात मोकाट कुत्र्याने धुमाकूळ घालत हसनैन कुरेशी (वय २) या बालकाच्या गालाचा लचका तोडल्याची घटना दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या या बाळाला घेत कुरेशी कुटुंबीय औरंगाबादकडे रवाना झाले आहे. 

मोकाट कुत्र्यांनी तब्बल नऊ जणांवर हल्ला चढवत चावा घेतल्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात दाखल जखमींची माहिती घेतल्यावर आढळून आला. जखमींत वृद्धासह लहान मुले व महिलांचाही  समावेश आहे.

शहरातील उस्मानिया पार्क येथील रहिवासी जाकीर खान कुरैशी यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये दोन वर्षीय हसनैन खेळत होता. यावेळी मोकाट कुत्र्याने कंपाउंडच्या गेटमधून आत प्रवेश करीत हल्ला चढवला. चिमुरड्या हसनैन याच्या गालाचा कडाडून चावा घेत बुथडा तोडतच बाहेर काढला. 

जवळच बसलेल्या मोठ्या आईने अचानक झालेल्या या कुत्र्याच्या हल्ल्यातून बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याच्या तावडीतून त्याला सोडवत असताना या कुत्र्याने त्याचे बोटेही तोडल्याची घटना घडल्याने परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. तद्‌नंतर शहरात विविध ठिकाणी ९ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेत 

Web Title: jalgav news dog bite to child chick