भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

असोदावासीयांची भूमिका; ‘एमआयडीसी’तील आरक्षित जागा घ्या

जळगाव - महापालिकेने असोदा शिवारातील ‘ट्रक टर्मिनस’साठी आरक्षित जागेच्या भूसंपादनाची तयारी सुरू केली होती. याला तेथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. याबाबत आयुक्तांकडे आज शेतकऱ्यांची सुनावणी झाली. यात शेतकऱ्यांनी आमची बागायती जमीन घेण्यापेक्षा औद्योगिक वसाहतीतील आरक्षित जागा ‘ट्रक टर्मिनस’साठी घ्यावी, अशी भूमिका मांडली. तसेच भूसंपादनाच्या त्रासाला कंटाळले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी आत्महत्येला परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. 

शहरातील खासगी बसचा थांबा ट्रान्स्पोर्टनगरच्या जागेवर हलविण्याचा विचार महापालिका करीत आहे. त्यामुळे असोदा शिवारातील दूरदर्शन टॉवरजवळ असलेल्या ट्रक टर्मिनसची आरक्षित जागा मोजण्यासाठी गेलेल्या महापालिका व भूमिअभिलेखच्या पथकाला जमीन मालक शेतकऱ्यांनी माघारी पाठवून भूसंपदानाला तीव्र विरोध केला होता. नऊ हेक्‍टर जागेवर सात शेतकऱ्यांची जमीन असून त्यावर २० खातेदार आहेत. भूसंपादन करण्यात येणारी ही जमीन बागायत आहे. सुनावणीत शेतकऱ्यांनी आयुक्तांकडे पर्यायी जागा घेण्याची विनंती केली. आमच्या जमिनी पिकावू असून, नवीन महामार्गामुले दोन भाग पडणार असल्याने जमिनीचा कसा उपयोग करता येईल, असे सांगितले. जमिनीजवळ अनेक धार्मिकस्थळे देखील आहेत. या जमिनीच्या आरक्षणाचा काही भाग महापालिकेने जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनसची पडिक जागा घ्यावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी आयुक्तांना केली. यावेळी शेतकऱ्यांना दिलेल्या एमआयडीसीतील महामार्गालगत असलेल्या पडिक जागेच्या पर्यायावर विचार करण्याचे आश्‍वासन दिले आहे. यावेळी अंबादास दुसाने, रवींद्र रोटे, शंकर चौधरी, लहू चौधरी, अनिल भोळे, दिलीप रडे, सुनील पांडे, शैलेश पांडे, अशोक बऱ्हाटे, सोपान बऱ्हाटे याच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
 
व्यापारी संकुल करण्याचे षडयंत्र
शेतकऱ्यांची बागायती जमीन ‘ट्रक टर्मिनस’च्या नावाखाली संपादित करून त्यावर व्यापारी संकुल तयार केले जाईल. तसेच ती स्वत:च्या नावावर करून घेण्याचे षडयंत्र महापालिकेतील काही जण करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

Web Title: jalgav news farmer oppose to land aquisition