‘जीएसटी’च्या माहितीपासून सर्वसामान्य दूरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

जळगाव - एक जुलैपासून देशभरात ‘जीएसटी’ लागू होणार आहे. ‘जीएसटी’मुळे व्यापारी, उद्योजकांकडून करचुकवेगिरी थांबणार असून, देशभरात एकच कर लागू होणार आहे. यामुळे सर्वत्र वस्तूचा दरही एकच असेल. मात्र, या कायद्याबाबत अनेकांना माहिती नाही. शासनाने ‘जीएसटी’बाबतचे ज्ञान सर्वसामान्य नागरिकांना देणे गरजेचे आहे.

महिलांसाठीच्या अनेक वस्तूंवरील ‘जीएसटी’ कमी करावा, नेमक्‍या कोणत्या वस्तूवर किती ‘जीएसटी’ भरावा, याबाबतची माहिती देण्यासाठी मार्गदर्शनपर शिबिरे घ्यावीत, अशी अपेक्षा शहरातील प्राध्यापक, सर्वसामान्य नागरिकांनी  ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

टॅक्‍स चुकविणे थांबेल
प्रा. विवेक काटदरे : पूर्वी सामान घेताना दुकानदार हिशेबात चालढकल करत असत. मात्र आता जीएसटीमुळे सर्वांनाच हिशोब चोख ठेवणे आवश्‍यक झाले आहे. अकाऊंटही खूप सांभाळून करावे लागणार आहे. जीएसटीमुळे टॅक्‍स चुकविण्याचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. मात्र जीएसटीच्या अटी समजून घेणे महत्त्वाचे आहे. या निर्णयाचा मात्र सर्वांना फायदाच होणार आहे. 
 
काही प्रमाणात उपयुक्‍त
प्रा. राजेंद्र देशमुख ः जीएसटी कायदा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी काही प्रमाणात उपयुक्त आहे. एकच किंमत संपूर्ण देशभरात लागू होणार असल्याने ते फायदेशीर आहे. यामुळे व्यवहार देखील सुरळीत होतील. महिलांसाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तूंवर मात्र जो अधिक कर आकारण्यात आला आहे. तो शासनाने कमी करायला हवा. नागरिकांनी जीएसटीबद्दल सर्व माहिती जाणून घेतल्यास अडचणी येणार नाही.

मार्गदर्शनाची गरज
प्रसाद मंडोरा (नागरिक) : नव्याने लागू होणारा जीएसटी कायदा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर आहे. सध्या तो अनेक लोकांना कळत नाहीये. मात्र एकदा तो समजला तर त्याचा नक्कीच फायदा होईल. नागरिकांनी जीएसटीची सवय करणे आवश्‍यक आहे. सुरवातीला थोडा त्रास होईल मात्र एकदा सवय झाली की पुढील पिढीसाठी हा कायदा उपयुक्त ठरेल. 

सर्वसामान्य अनभिज्ञच
महेंद्र पाटील (नागरिक) : शासनाने नव्याने सुरू करण्यात येणारा जीएसटी कायदा हा काही प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा आहे. परंतु काही अंशी हा त्रासदायक देखील आहे. जीएसटी अद्याप अनेक नागरिकांना पूर्णपणे माहीत नाही. त्यामुळे तो सुरू झाल्यानंतर अडचणी निर्माण होणार आहे. यासाठी शासनाने नागरिकांना हा कायदा पूर्ण समजेल यासाठी आधी प्रयत्न केले पाहिजे.

Web Title: jalgav news General Remote to gst information