‘उत्कृष्ट आर्थिक साक्षरता’ने जळगाव जनता बॅंकेचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

जळगाव - जळगाव जनता सहकारी बॅंकेला ‘बॅंकिंग फ्रंटियर’ मासिकातर्फे ‘बॅंकिंग फ्रंटियर उत्कृष्ट आर्थिक साक्षरता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. बॅंकेने विविध कार्यक्रमांचे नियोजन करून जास्तीत जास्त सभासद व ग्राहक आर्थिक साक्षर होण्यास प्राधान्य दिले आहे.

जळगाव - जळगाव जनता सहकारी बॅंकेला ‘बॅंकिंग फ्रंटियर’ मासिकातर्फे ‘बॅंकिंग फ्रंटियर उत्कृष्ट आर्थिक साक्षरता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. बॅंकेने विविध कार्यक्रमांचे नियोजन करून जास्तीत जास्त सभासद व ग्राहक आर्थिक साक्षर होण्यास प्राधान्य दिले आहे.

जळगाव जनता बॅंकेतर्फे सभासद व ग्राहकांसाठी कॅशलेस व्यवहारांची माहिती होण्याच्या अनुषंगाने ‘ई- साक्षरता अभियान’ माहितीपुस्तिकेचेही वाटप करण्यात आले होते. ‘बॅंकिंग फ्रंटियर’ मासिकातर्फे सहकारी बॅंकांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘उत्कृष्ट साक्षरता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येत असते. त्यानुसार यंदा जळगाव जनता बॅंकेला शुक्रवारी (८ सप्टेंबर) जयपूर येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार ‘बॅंकिंग फ्रंटियर’चे पब्लिशर बाबूभाई नायर, ‘एफआयएस’चे प्रतीक बॅनर्जी, गुजरात को- ऑपरेटिव्ह बॅंक फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. शाह व महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅंक फेडरेशनच्या सदस्या शोभा सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बॅंकेचे संचालक विवेक पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. अल्पावधीतच बॅंकेने २१०० कोटींच्या वर एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला असून, बॅंकेस ‘बॅंकिंग फ्रंटियर’मार्फत ‘बॅंकिंग फ्रंटियर उत्कृष्ट आर्थिक साक्षरता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हे बॅंकेच्या प्रगतीचेच द्योतक आहे. बॅंकेची अल्पावधीतील प्रगती बॅंकेचे सभासद, ग्राहकांचे सहकार्य व बॅंकेवरील विश्‍वास यांमुळेच होत असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी संचालक मंडळातर्फे कळविले आहे.

Web Title: jalgav news jalgav janata bank honour