जागा हडपल्याच्या तणावातून वृद्ध सराफाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

जळगाव - स्वमालकीची जागा व दुकान अकरा महिन्यांच्या करारावर दिल्यानंतर करार पूर्ण होऊनही जागा ताब्यात न देता संबंधित भाडेकरूने ती हडप केली व मालकालाच धमकी दिली. या तणावातून जागामालक वृद्ध सराफ व्यावसायिकाने सोमवारी विष प्राशन केले होते, त्यांचा आज मृत्यू झाला. रमेश रतनशेठ विभांडिक (वय 70) असे या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे.

दरम्यान, संबंधित भाडेकरूने जागा हडप करण्याबाबत यापूर्वी जिल्हाधिकारी, पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही उपयोग झाला नाही, अशी गंभीर बाबही सराफ व्यावसायिकाच्या मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात सराफ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित जमून गदारोळ केल्याचेही वृत्त आहे.

Web Title: jalgav news jewellers suicide

टॅग्स