‘एक दिवा’ लेकीसाठी...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

जळगाव - कोपर्डी येथे युवतीवर अत्याचार झाल्याच्या घटनेला आज (१३ जुलै) एक वर्ष पूर्ण झाले. या घटनेचा निषेध म्हणून मराठा समाजातर्फे मूकमोर्चा काढून ‘एक दिवा लेकीसाठी...’ प्रज्वलित करून श्रद्धांजलीपर संवेदना व्यक्‍त करण्यात आल्या.

जळगाव - कोपर्डी येथे युवतीवर अत्याचार झाल्याच्या घटनेला आज (१३ जुलै) एक वर्ष पूर्ण झाले. या घटनेचा निषेध म्हणून मराठा समाजातर्फे मूकमोर्चा काढून ‘एक दिवा लेकीसाठी...’ प्रज्वलित करून श्रद्धांजलीपर संवेदना व्यक्‍त करण्यात आल्या.

शहरातील काव्यरत्नावली चौकात सायंकाळी साडेसहाला निषेध व श्रद्धांजलीपर कार्यक्रम झाला. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हा प्रभारी दिलीप पाटील वळसे पाटील, आमदार सतीश पाटील, ॲड. रवींद्र पाटील, विनोद देशमुख आदी उपस्थित होते. कोपर्डी घटनेतील दोषींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी पोलिस विभागाकडून तत्काळ पावले उचलून पीडित युवतीच्या कुटुंबाला न्याय देण्याची घोषणा शासनाने केली. पण या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना न्याय मिळालेला नाही. याचा निषेध म्हणून आज शहरातील, गावांतील प्रमुख चौकाचौकांमध्ये समाजबांधवांनी एकत्र येत एक दिवा प्रज्वलित करून श्रद्धांजलीपर संवेदना व्यक्त करण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार आज सायंकाळी साडेसहाला सकल मराठा समाजाच्यावतीने काव्यरत्नावली चौकात दिवा प्रज्वलित करत संवेदना व्यक्‍त केल्या.

यांची होती उपस्थिती
संगीता पाटील, गीता देसाई,  कु.श्रद्धा पाटील, सुनीता पाटील,  प्रीती नरवाडे, डॉ. सीमा पाटील, शैलजा चव्हाण, लता इंगळे, गायत्री पाटील, रचना पाटील, ज्योती पाटील, जयश्री पाटील, रश्‍मी कदम, अपर्णा पाटील, लिना पवार, अश्विनी देशमुख,  दीपशिखा पाटील, गायत्री बोरसे आदी महिला. तसेच डॉ. राजेश पाटील, डॉ. निरंजन चव्हाण, शांताराम पाटील, श्रीराम पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, अनिल पाटील,  प्रदीप सोळुंके, ॲड.सचिन चव्हाण,  ॲड. अनिल पाटील, ॲड. संजयसिंग पाटील, ॲड. आशिष पाटील, विजय देसाई, दीपक सूर्यवंशी, रवींद्र जगताप, रवींद्र पवार, कृष्णा पाटील, शेखर मगर, संदेश भोईटे, चंद्रकांत कापसे, एस. एन. पाटील, प्रा. अजित वाघ, खुशाल चव्हाण, योगेश देशमुख, विकास नरवाडे, निर्मल पाटील, प्रा. राजेंद्र देशमुख, अरविंद निकम, समीर जाधव, सुरेंद्र पाटील, हिरेश कदम, योगेश पाटील, मिलिंद सोनवणे, महेश पाटील, सागर पाटील, दिनेश पाटील, मालोजी पाटील,पियुष पाटील, प्रमोद पाटील, सुदाम पाटील, रमेश पाटील.

Web Title: jalgav news kopardi case protest silent motion