मेडिकल, स्टेशनरी विक्रेते ‘जीएसटी’बाबत ‘अपडेट’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

‘टॅली’च्या सॉफ्टवेअरची व्यापारी घेताहेत अधिक माहिती
जळगाव - शहरासह जिल्ह्यातील मेडिसीन डीलर, होलसेलर, शालेय उपयोगी वस्तू विक्री करणारे, स्टेशनरी विक्रेत्यांनी ‘जीएसटी’ची नोंदणी केली आहे. कोणत्या वस्तूवर किती ‘जीएसटी’ लागेल, याची यादीच तयार केली आहे. ‘जीएसटी’ची माहिती उपलब्ध झाल्याने आम्ही ‘अपडेट’ झालो आहोत, अशा प्रतिक्रिया शहरातील मेडिसीन डीलर, स्टेशनरी विक्रेत्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या.

औषधांना मिळाला कोड
सुनील भंगाळे (अध्यक्ष, जळगाव जिल्हा मेडिसीन डीलर असोसिएशन) - ‘जीएसटी’चे जिल्हा मेडिसीन डीलर असोसिएशनतर्फे स्वागत आहे. एक जुलैच्या दृष्टीने केमिस्ट त्यादृष्टीने तयारी करीत आहे. आम्हाला औषधांना लावण्यासाठी एक विशिष्ट कोड दिलेला आहे. ते लावून आम्हाला मेडिसीन विकता येईल. स्टॉकबाबत आम्ही अपडेट होत आहोत. 

स्टॉक अपडेट ठेवला
संतोष अग्रवाल (संचालक, नम्रता टेडर्स) - ‘जीएसटी’ सुरू झाल्यानंतर ते समजून घेण्यासाठी किमान चार पाच दिवस तरी लागतील. एक जुलैला जीएसटी लागू होणार आहे. ‘टॅली’च्या माध्यमातून बिलींग सिस्टिम सुरू होईल. आम्हाला याबाबत डेमो दाखविला गेला आहे. मात्र बिल कसे तयार होऊन बाहेर येईल ते एक तारखेलाच समजेल. व्हॅट प्रमाणे जीएसटीचे रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. मागील स्टॉकचे अपडेट ठेवले आहे.

चित्रकलेच्या वह्यांवर जीएसटी नाही
आर. आर. महाजन (संचालक, आर. के. बुक मॅन्युफॅक्‍चरिंग) - नोटबुक्‍स वर पाच टक्के, रजिस्टर व इतर लाँग बुकवर बारा टक्के जीएसटी लागणार आहे. चित्रकलेच्या वह्यांवर जीएसटी लागणार नाही. स्टेशनरीच्या कोणत्या वस्तूवर किती टक्के जीएसटी लागणार याची माहिती घेतली आहे. ‘जीएसटी’बाबत अभ्यास सुरू आहे.

‘जीएसटी’बाबत अपडेट
अनिल झंवर (सचिव, जळगाव जिल्हा मेडिसीन डीलर असोसिएशन) - ‘जीएसटी’बाबत मेडिसीन विक्रेत्यांची तयारी झाली आहे. कोणत्या औषधी, सौंदर्यप्रसाधने, इतर प्रॉडक्‍टवर किती टक्के जीएसटी लागणार आहे. याची आम्हाला माहिती झालेली आहे. यामुळे आम्ही सर्व अपडेट झालो आहोत. शासनातर्फे मात्र अद्यापही जीएसटी एक तारखेपासून लागू याबाबत पत्र, सूचना आलेल्या नाहीत.

Web Title: jalgav news medical, stationary sailer update about gst