गांधी उद्यानातील खूनप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

मृताच्या नातलगांचीही पोलिसांकडून चौकशी; संशयितांच्या शोधार्थ पथके

जळगाव - गांधी उद्यानात शुक्रवारी (२ जून) बांधकाम ठेकेदाराच्या मृत्यूची घटना उघडकीस आल्यानंतर आता या घटनेच्या तपासासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेजसह मृताच्या नातलगांचीही चौकशी करीत आहेत.

घटनेनंतर चोवीस तास उलटूनही अद्याप याबाबत पोलिस ठोस निष्कर्षाप्रत पोहोचू शकलेले नाहीत. 

रामेश्‍वर कॉलनीतील रहिवासी तथा ४५ वर्षीय श्रावण भगीरथ राठोड दुपारी चारला दुचाकीवरून घराबाहेर पडले. थकीत वीजबिल भरणा करून येतो, असे सांगून दहा हजार रुपये सोबत घेऊन राठोड घरून निघाले होते. त्यानंतर रात्रभर घरी परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी गांधी उद्यानात त्याचा मृतदेह आढळून आला. 

चौकशी सत्रास सुरवात
डॉक्‍टरांनी प्राथमिक पाहणीनंतरच संशय व्यक्त केल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी संशयिताच्या शोधार्थ डीबी पथक कार्यरत केले. श्रावण राठोड काम करीत असलेल्या जागी, रहिवास असलेल्या रामेश्‍वर कॉलनीतून पोलिसांतर्फे माहिती गोळा करण्यात येत असून, कुटुंबालाही विचारणा करण्यात आली. मात्र, सरळ स्वभावाचा मजूर व्यक्ती सकाळी घरून गेला की रात्रीच साडेअकराच्या सुमारास परतणार, अशी माहिती समोर आली. गांधी उद्यानाचा वॉचमन, बाहेरील विक्रेत्यांनाही विचारपूस करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयापासून स्वातंत्र्य चौक आणि स्वातंत्र्य चौक ते पत्रकार कॉलनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.

वायरने गळा आवळला
श्रावण राठोड यांच्या गळ्याला धातूच्या तारेने किंवा वाहनात वापरल्या जाणाऱ्या क्‍लचवायरसारख्या वायरने एकाने गळा आवळला, तर दुसरा दोन्ही हात धरून छाती-पोटावर बसलेला असण्याची शक्‍यता आहे. कारण मृताचे दोन्ही हात सरळ दिशेने होते, तर पायाच्या बाजूने जमिनीवर दोन्ही पाय घासल्याचे आढळून आले. तोंड आणि उजव्या नाकपुडीतून पांढरा फेस आल्याचे जाणवत असून, काहीतरी विषारी द्रव पाजले असण्याचीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: jalgav news murder case cctv footage cheaking