नांद्राच्या ग्रामस्थांची दारूबंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

जळगाव - ग्रामसभेचा ठराव झाल्यानंतरही गावात दारूबंदी झाली नसल्याने आज नांद्रा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. दरम्यान दारूबंदीसाठी मतदानाची मागणी केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ऐनपूर पाठोपाठ आता जळगाव तालुक्‍यातील नांद्रा बुद्रुक येथील ग्रामस्थांसह महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसात गावाला भेट देऊन दारूबंदीचा निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र जिल्हाधिकारी नांद्रा बुद्रुकला आले नसल्याने महिलांनी आज पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. याठिकाणी महसूल उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. चर्चेअंती दारूबंदीसाठी मतदान घेण्याची मागणी केली. 
यावेळी पंचायत समिती सदस्य हर्शल चौधरी, विलास चौधरी, कमलाकर सोनवणे, हिरामण वाघ, शरद सोनवणे, नरेंद्र पाटील, मनोज पाटील, चुडामण वाघ, अशोक सोनवणे, नितीन बाविस्कर, कमलबाई सोनवणे, ज्ञानेश्‍वर सोनवणे, गणेश सोनवणे, संतोष इंगळे आदी उपस्थित होते.

Web Title: jalgav news nandra public go to collector for wine ban