फुले, सेंट्रल फुले संकुलातील चारशे गाळेधारकांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

‘मनपा’चा ८१ ‘ब’नुसार अंतिम इशारा; व्यापाऱ्यांमध्ये घबराट
जळगाव - औरंगाबाद खंडपीठाने येथील महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या अठरा व्यापारी संकुलांतील गाळे दोन महिन्यांत ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित गाळे ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेस काल महापालिकेने सुरवात करून गाळेधारकांना अंतिम नोटिसा बजावण्यास सुरवात केली. त्यानुसार काल व आज या दोन दिवसांत
चारशे गाळेधारकांना महापालिका कर्मचाऱ्यांनी नोटिसा दिल्या. त्यामुळे संबंधित गाळेधारकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.   

औरंगाबाद खंडपीठाने जळगाव महापालिकेस मुदत संपलेल्या संकुलांतील गाळे दोन महिन्यांत ताब्यात घेण्याचे आदेश १४ जुलैला दिले. त्यानुसार सुनावणी बाकी असलेल्या एक हजार ७३२ गाळेधारकांची सुनावणी महापालिकेतर्फे पूर्ण करण्यात आली. काल फुले व्यापारी संकुलातील ८९ गाळेधारकांना ८१ ‘ब’ची अंतिम नोटीस बजावून गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आजही महापालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित गाळेधारकांना नोटिसा दिल्या. त्यात गाळेधारकांनी नोटीस मिळाल्यापासून तीस दिवसांत महापालिकेच्या ताब्यात गाळा देण्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 

संकुलांतील काही दुकाने बंद
महापालिका कर्मचारी आज नोटीस देण्यासाठी गेले असता फुले व सेंट्रल फुले व्यापारी संकुलातील काही दुकाने बंद असल्याचे दिसून आले. तसेच काही गाळेमालक दुसऱ्या गावाला राहत असल्याने त्यांना नोटीस देणे राहिले. लवकरच या गाळेधारकांनाही नोटीस दिली जाणार आहे.

पर्यायी व्‍यवस्‍थेसाठी व्यापाऱ्यांना चिंता
महापालिकेकडून गाळेधारकांना अंतिम नोटिसा बजाल्या जात असल्याने गाळेधारकांमध्ये आता घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभरात गाळा खाली करून तो महापालिकेच्या ताब्यात द्यावयाचा असल्याने दुकानातील माल विकणे तसेच उरलेला माल कुठे ठेवावा, याची चिंता आता गाळेधारकांना लागली आहे. दुकान तसेच माल ठेवण्याची पर्यायी व्यवस्था शोधण्याचे नवे काम आता गाळेधारकांना लागल्याने त्यांच्यात चिंता निर्माण झाली आहे.

Web Title: jalgav news phule, central phule complex shop owner notice by municipal