जळगावात दोन पोलिसांकडून सहाय्यक फौजदारास मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

जळगाव - जिल्हा पोलिस दलाच्या अखत्यारीतील चिमुकले राम मंदिराच्या प्रवेशद्वारातच मुख्यालयातील दोन पोलिसांनी सेवानिवृत्तीला आलेल्या सहाय्यक फौजदाराला आज बेदम मारहाण केली. सकाळी साडेआठच्या सुमारास प्रवेशद्वाराच्या भिंतीजवळ पूजा साहित्य न ठेवण्यास सांगितल्याच्या कारणातून तिघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यार्च पर्यवसान हाणामारीत होऊन दोघांनी नामदेव ठाकरे (एएसआय) यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून गळा दाबल्याने गोंधळ उडाला. ठाकरे यांनी बचावात्मक प्रतिकार केला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस दलाच्या मुख्यालयात सहाय्यक फौजदारपदावर कार्यरत नामदेव बाबूराव ठाकरे (वय ५७) यांनी दिलेल्या माहितीनुसार ते पोलिस दलाच्याच चिमुकले राम मंदिराचे भक्त आहेत. श्रावण मासामुळे उपवास आणि पूजा साहित्य गेल्या काही दिवसांपासून मंदिराच्या भिंतीलगतच ठेवत होते. प्रवेशद्वाराजवळील भिंतीला लागून असलेल्या कोपऱ्यात ठेवलेले साहित्य घेऊन जा, असे फर्मान मंदिराचा चौकीदार पोलिस निंबा महाजन याने ठाकरे यांना दिले होते. पूजा साहित्य आणि प्रार्थनेसाठी लागणारी गर्दी आहे. दुसरे काही नाही, आपण माळकरी असून महिन्याचे उपवास असल्याने पूजेसाठी ते लागत असते. ड्यूटीवरून ये-जा करताना पूजा-प्रार्थना होते. नंतर उचलून घेईल, असे ठाकरे यांनी महाजन यांना सांगितले होते. आज सकाळी साडेआठच्या सुमारास नामदेव ठाकरे पूजेसाठी मंदिरात आले होते. यावेळी पोलिस गोपीचंद पाटील (शस्त्रागार दुरुस्ती विभाग) याने तुला सामान ठेवू नको, असे सांगितले असतानाही का ठेवतो म्हणून दरडावले. दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू असतानाच मागून राजू देवराम शिंदे आला व त्याने ठाकरे यांच्या वयाची तमा न बाळगताच मारहाण करणे सुरू केले. त्यावर ठाकरेंनीही प्रतिकार केला. मात्र, मारहाण करणारे दोघे तरुण असल्याने त्यांचा प्रतिकार तोकडा ठरला.

पोलिस ठाण्यात तक्रार
चौकीदाराच्या सूचनेवरून आपण साहित्य उचलून घेतले होते, तरी मुद्दाम संबंधित दोघांनी आज वाद घालून छातीत, पाठीवर, गालावर बेदम मारहाण करून राजू शिंदे याने गळा दाबल्याची तक्रार जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे अंमलदार सुनील जोशी यांना दिली. तसेच घलेडल्या प्रकाराबाबत पोलिस उपअधीक्षकांनाही फोन केला. मात्र, ते गुन्हे आढावा बैठकीत असल्याने संपर्क होऊ शकला नाही. सेवानिवृत्तीला काही दिवस उरले असताना आपल्याच पोलिसांकडून मारहाण झाल्याचे वाईट वाटते, असे ठाकरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: jalgav news police beating to police officer