सुनेचा छळ करणाऱ्या फौजदाराला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

जळगाव - विवाहितेचा छळ करून पीडितेच्या आत्याला मारहाण केल्याची घटना शहरातील उस्मानिया पार्कमध्ये घडली. जखमी महिलेची प्रकृती गंभीर असून, तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्यालयात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक सासऱ्याला अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

शहर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद केल्यानुसार, बाहेरील जिल्ह्यात नियुक्त उपनिरीक्षकाची पत्नी मिसबा अझरुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून पती अझरुद्दीन शेख, सासू रुकसानाबी शेख, सासरे हुसनोद्दीन अब्दुल कादर शेख, जेठ वसीम शेख, दीर मोहसीन शेख, नणंद मुबशरा शेख यांच्याविरुद्ध हाणामारी, कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. यातील पती अझरुद्दीन शेख, जेठ वसीम शेख, दीर मोहसीन शेख व नणंद मुबशरा शेख यांनी अटकपूर्व जामीन मिळविला. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सून मिसबा शेख या रस्त्याने घरी जात होत्या. यावेळी सासू-सासरे यांनी आपल्या कारने येऊन विवाहितेची आत्या नसरीनबानो लतीफ शेख यांना  हुसोनोद्दीन शेख यांनी गाडीवर आपटून जोरात ढकले. या मारहाणीत नसरीनबानो यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन मेंदूत अंतर्गत रक्तस्राव झाल्याने प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत. परिणामी याप्रकरणी फिर्यादीचा पुरवणी जबाब नोंदवून संशयित आरोपींविरुद्ध वाढीव कलम लावण्यात आले. त्याअनुषंगाने पोलिसांनी उपनिरीक्षक हुसनोद्दीन अब्दुल कादर शेख यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्या. कांबळे यांनी संशयिताला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: jalgav news police officer arrested

टॅग्स