मुख्याध्यापकांसाठी ‘आर.आर’च्या शिक्षकांचा लढा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

जिल्हा परिषदेसमोर ६८ शिक्षकांचे धरणे; निलंबन मागे घेण्याची मागणी

जळगाव - ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद विद्यालयातील मुख्याध्यापक डी. एस. सरोदे यांना संस्थाचालकांनी निलंबित केले आहे. या विरोधात शाळेतील शिक्षकांनी लढा पुकारला असून, निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीचे संस्थाध्यक्ष अरविंद लाठी हे अत्यंत हेकेखोरपणे, बेकायदेशीर व नियमबाह्य कार्यवाही करून शिक्षकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. त्यांच्या या प्रवृत्तीमुळेच मुख्याध्यापक डी. एस. सरोदे यांचे अन्यायकारक निलंबन केले आहे.

संस्थाध्यक्षांच्या दहशतीला आळा बसावा. तसेच मुख्याध्यापक सरोदे यांचे निलंबन मागे घेऊन संस्थेवर प्रशासक बसवावा. या प्रमुख मागणीसाठी शाळेतील शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यात आज (ता. १५) जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागासमोर शिक्षकांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यात ६८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच उपमुख्याध्यापिका व्ही. के. काबरा, एन. आर. कुमावत, पी. एस. वानखेडे, पी. एस. याज्ञिक, बी. आर. बसेर, एस. एम. भोसले यांच्या शिष्टमंडळाने मुख्याध्यापक सरोदे यांचे निलंबन मागे घ्यावे, चौकशी अहवालावर लवकर कार्यवाही करून प्रशासक नियुक्‍ती आणि संस्थाध्यक्षांसह व्यवस्थापन मंडळाचा शालेय प्रशासकीय कामात हस्तक्षेप रोखावा. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

विविध संघटनांचा पाठिंबा
आर. आर. विद्यालयाच्या शिक्षकांनी पुकारलेल्या आंदोलनाला विद्यमान तसेच माजी विद्यार्थी, पालक, पालक- शिक्षक संघाचे पदाधिकारी, शिक्षक लोकशाही आघाडी, शिक्षक भारती, माध्यमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा मुख्याध्यापक संघ, कलाध्यापक संघ, कोळी समाज माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर मंडळ, वाल्मीकराव फाउंडेशन, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवा संघटना, परीट (धोबी) सेवा मंडळ आदी संघटनांनी पाठिंबा दर्शविला. तर भारतीय दलित हक्‍क संघर्ष समिती, चर्मकार उढाव संघ, हिंदी अध्यापक मंडळ, भाजपा शिक्षक आघाडी यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग नोंदविला.

Web Title: jalgav news rr teacher agitation for headmaster