आला श्रावण आला..!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

जळगाव - श्रावणी सोमवारचे व्रत, महादेवाला शिवामूठ, नवविवाहितेचे मंगळागौर पूजन, सोळा सोमवारचे व्रत आणि घरोघरी होणारे धार्मिक कहाण्यांचे वाचन. गोकुळाष्टमी, दहीहंडी उत्सव अन्‌ सार्वजनिक ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या सत्यनारायण पूजा. उद्यापासून (२४ जुलै) व्रतवैकल्यांचा आणि सण-उत्सवांचा श्रावण मास सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात आज पावसाच्या सरी अंगावर झेलत धार्मिक पुस्तके, पूजा साहित्य खरेदीचा आनंद जळगावकरांनी घेतला.

आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला असून, श्रावणही आता उद्यापासून (२४ जुलै) सुरू होत आहे. यानिमित्ताने शहरातील ओंकारेश्‍वर मंदिर, निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर, सिंधी कॉलनीतील गौरी शंकर, श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थान दर्शनासाठी उद्या (२४ जुलै) दिवसभर खुले ठेवण्यात येणार आहे. यानिमित्ताने मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या मंदिरांत विशेषतः महादेव मंदिरांत लघुरुद्र, महारुद्राभिषेकांचे नियोजन भाविकांकडून केले जाते. श्रावणातील शुद्ध पंचमीस नागपंचमी, नारळी पौर्णिमा अर्थात रक्षा बंधन, पिठोरी अमावास्या, पोळा हेदेखील सण-उत्सव आहेत. या महिन्यात गुरुचरित्र, नवनाथ भक्तिसागर यांसारख्या विविध ग्रंथांचीही पारायणे आयोजित केले जातात. 

विशेषतः आघाडा, दूर्वा, फुलांना या महिन्यात मोठी मागणी असते. त्यामुळे पूजा साहित्य, धार्मिक पुस्तकांची आवर्जून खरेदी-विक्री होते. कापसाची माळावस्त्रे, सुपाऱ्या, विड्याची पाने, फळे, हळद-कुंकू, जानवी जोड यासारख्या विविध वस्तू धार्मिक विधींसाठी लागत असल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण होऊन हजारोंची उलाढाल होत असते. छोट्या विक्रेत्यांच्या आघाडा, दूर्वा, फूल, विड्याची पाने विक्रीच्या हातगाड्या शहरात ठिकठिकाणी लागलेली दृष्टीस पडतात. 

ओंकारेश्‍वर मंदिर सज्ज 
जळगावकरांचे श्रद्धास्थान असलेले ओंकारेश्‍वर मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला असून, भाविकांना 
 
यंदाच्या श्रावणातील सण-उत्सव
२४ जुलै : पहिला श्रावणी सोमवार (शिवामूठ - तांदूळ)
२७ जुलै : गुरुवार- नागपंचमी
३० जुलै : रविवार- कानबाई उत्सव/रोठ
३१ जुलै : दुसरा श्रावणी सोमवार (शिवामूठ - तीळ)
७ ऑगस्ट : नारळी पौर्णिमा/रक्षा बंधन 
७ ऑगस्ट : तिसरा श्रावणी सोमवार (शिवामूठ - मूग)
१४ ऑगस्ट : श्रीकृष्ण जयंती
१४ ऑगस्ट : चौथा श्रावणी सोमवार (शिवामूठ - जवस) 
१५ ऑगस्ट : गोपाळकाला
२१ ऑगस्ट : श्रावण अमावस्या अर्थात पोळा
२१ ऑगस्ट : पाचवा श्रावणी सोमवार (शिवामूठ : सातू)

Web Title: jalgav news sharavn coming