गाळे ताब्यात घेण्याचा ‘मनपा’चा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

खंडपीठाचे आदेश प्राप्त; कारवाई कायदेशीरच असल्‍याचा निर्वाळा
जळगाव - गाळेकराराची मुदत संपलेल्या व कर थकबाकीदार असलेल्या महापालिकेच्या फुले मार्केट व सेंट्रल मार्केटसह अठरा व्यापारी संकुलांतील गाळे ताब्यात घेण्याची कार्यवाही महापालिकेने करावी, यासंबंधीचा औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आदेश आज महापालिकेस प्राप्त झाला. दोन महिन्यांत महापालिकेने ही कार्यवाही करावयाची असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. यामुळे आता महापालिकेला गाळे ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

महापालिकेच्या मुदत संपलेल्या तसेच थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई करण्याबाबतच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली.

न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील व एस. सी. धर्माधिकारी यांच्यासमोर ही सुनावणी घेण्यात आली. याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे, की गाळे खाली करण्याची महापालिकेची कृती कायदेशीर आहे, ती कुठल्याही वादास पात्र नाही. जमिनीची मालकी व व्यापारी संकुले यात कुठलाही भेदभाव न करता कायदेशीर कारवाई करावी. कर न भरता गाळ्यांचा भोगवटा सुरूच ठेवला असेल, अशा प्रत्येकाला कारणे दाखवा नोटीस देवून भाग ८ ‘अ’ महापालिका अधिनियमानुसार कारवाई सुरू करावी, असेही स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. 

ठराव क्रमांक १३५ फेटाळला
महापालिकेने केलेला ठराव क्रमांक १३५ नुसार रेडिरेक्‍नर दरानुसार प्रीमियम आकारणी आकारणी करून तीन वर्षांसाठी भोगवटा बहाल करण्यात यावा, असे म्हटले होते. खंडपीठाने हा ठरावही फेटाळला आहे, त्याबाबत स्पष्ट म्हटले आहे की, हा ठराव म्हणजे थकबाकीदार वाणिज्य भोगवटादारांना अप्रत्यक्षपणे संरक्षण देण्यासाठी व त्यांना नियमांना डावलून मागील दाराने छुपी मदत देण्यासाठी जे नागरिक नियमित कर भरत नाहीत, त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रकार आहे. 

दोन महिन्यांत ताब्यात घ्यावे
महानगरपालिका संपूर्ण गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुक्तपणे पूर्ण करू शकते. करवसुलीसाठी नियमानुसार कारवाई करू शकते आणि निकाल प्राप्त झाल्यापासून दोन महिन्यांत ही पूर्ण करणे बंधनकारक  असणार आहे. त्यामुळे महापालिकेला दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 

दहा ऑगस्टनंतर कारवाई 
महापालिकेतर्फे गाळेधारकांची सुनावणी घेण्यात येत आहे. उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्याकडे सेंट्रल फुले मार्केट व फुले मार्केटची सुनावणी सुरू आहे. तर नगररचना अधिकारी फडणवीस यांच्याकडे इतर संकुलाची सुनावणी सुरू आहे. दहा ऑगस्टपर्यंत ही सुनावणी पूर्ण होईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त कहार यांनी दिली.

Web Title: jalgav news Take the path of 'Municipal' to take over the shops