उस्मानिया पार्कमध्ये चोरट्यांची ‘हॅट्‌ट्रिक’

जळगाव - फोडलेले कपाट व इतरत्र पडलेले साहित्य.
जळगाव - फोडलेले कपाट व इतरत्र पडलेले साहित्य.

जळगाव - शिवाजीनगर भागातील विस्तारित परिसरात असलेल्या उस्मानिया पार्क व अमन पार्क कॉलनीत गेल्या तीन दिवसांपासून सलग चोऱ्या, घरफोड्यांच्या घटना घडत आहेत. एकाच रात्रीतून चार घरांत चोऱ्या केल्यानंतर बुधवारी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातून मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली. आज अमन पार्क भागातील रहिवासी सेवानिवृत्त वनरक्षक कुटुंबासह शेजारीच शालकाकडे जेवणाला गेले असताना एक तासात चोरट्याने मागील दार तोडून घरातील दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना घडली. 

उस्मानिया पार्क परिसरातील अमनपार्क कॉलनीतील रहिवासी तथा निवृत्त वनरक्षक (आरएफओ) शाकीर शेख कादर यांच्या घरी आज (ता. २९) रात्रीसाडे आठ ते साडेनऊच्या दरम्यान चोरट्याने डल्ला मारला. शाकीर शेख हे पत्नी व दोन मुलांसह शेजारीच राहणारे त्यांचे शालक इक्‍बाल यांच्याकडे ईदनिमित्त मेजवानीला गेले होते. जेवण आटोपल्यावर शेख घराची चावी घेऊन परतले. मुख्य दाराचे कुलूप उघडूनही दार आतून बंद होते. दार उघडत नसल्याने त्यांनी मागे येऊन बघितले असता मागचे दार उघडेच होते. आत आल्यावर मागच्या खोलीतील पलंगातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने त्यांना चोरी झाल्याची शंका आली. आतील बेडरूममध्ये जाऊन पाहिल्यावर गोदरेज कपाटातील साहित्य, कपडे अस्ताव्यस्त फेकून चोरट्याने आतील तिजोरी उघडून त्यातील दागिने व इतर साहित्य लांबविल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शालक इक्‍बाल व दोघा मुलांना आवाज देऊन बोलावले. तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर शहर पोलिस ठाण्यातील बिटमार्शल इम्रान सय्यद, दोघांनी जाऊन पाहणी केल्यावर घटनास्थळावर नवीन टॉमी, बिडीचे धुटूक असे सापडून आले. शेख यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

चावीने उघडले कपाट 
चोरट्याने नव्या कोऱ्या टॉमीने मागील दार तोडून आत प्रवेश केला. आत आल्यावर पहिली खोली, तसेच दुसऱ्या खोलीत निवांतपणे झाडाझडती घेतल्यावर आत बेडरुममध्ये शिरला. मेजवर ठेवलेल्या पर्समध्ये कपाटाची चावी काढून त्याने कपाट उघडले व आतील साहित्य, रोकड चोरून नेली. 
पळून जातानाचे ठसे...

शेख यांच्या घराच्या मागील बाजूस मोकळे पटांगण आहे. तेथून येत चोरट्याने आत चोरी केली. जाताना त्याच मार्गाने गेल्याचे पायाचे ठसे गटारीच्या चिखलात उमटल्याचे दिसून आले.

चोरी गेलेला ऐवज असा 
सोन्याची चैन : ७ ग्रॅम,  कानातील झुमके : ७ ग्रॅम (हिरे जडीत)  रोख : ३ ते ४ हजार रुपये   घड्याळ : ४ नग   मोबाईल : १  इमिटेशन ज्वेलरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com