बारा तासांत कापले दोनशे किलोमीटर अंतर!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेत जळगाव रनर्स ग्रुपचा विक्रम

जळगाव - अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर अशक्‍यप्राय अशा स्पर्धेतदेखील यश संपादन करता येते, हे जळगाव रनर्स ग्रुपच्या सदस्यांनी यांनी दाखवून दिले आहे. धुळे येथे रविवारी (ता. १६) धुळे येथील औडेक्‍स संस्थेतर्फे भर पावसात आयोजित केलेल्या अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेत धुळे ते चांदवड, चांदवडहून परत धुळे असे दोनशे किलोमीटर अंतर जळगावातील डॉ. रवी हिरानी, ॲड. सागर चित्रे, स्वप्नील मराठे या तीन सायकलपटूंनी केवळ बारा तासांत पूर्ण केले. 

रविवारी सकाळी सहाला स्पर्धा सुरू झाली. धुळे ते चांदवड आणि चांदवडहून परत धुळे, असा या स्पर्धेचा मार्ग होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या २९ सदस्यांना या दोनशे किलोमीटर अंतरासाठी साडेतेरा तासांचा वेळ देण्यात आला होता. त्यात उल्लेखनीय बाब म्हणजे या सर्वांनी ही स्पर्धा केवळ बारा तासांत पूर्ण केली. 

स्पर्धेतील विजेते म्हणाले की, रविवारी या परिसरात पाऊस आणि जोराचा वारा होता. त्यात महामार्ग असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा, चढावाचाही प्रचंड त्रास होत होता. तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या सर्वांनी पावसाची तमा न बाळगता केवळ बारा तासांत ही स्पर्धा पूर्ण करीत यश मिळविले.  
ॲड. आनंद परांजपे, किरण बच्छाव, विक्रांत सराफ, नीलेश भांडारकर, नरेंद्रसिंग सोलंकी, अविनाश काबरा यांनी मार्गदर्शन केले. जळगाव रनर्स ग्रुपचे सर्व सदस्य, कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिले.

Web Title: jalgav news ultra cycling competition