जळगाव जिल्ह्यात १३३ ठिकाणी दूषित पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

जि. प. जलव्यवस्थापन समितीची सभा; आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश
जळगाव - जिल्ह्यात १३३ ठिकाणी दूषित पाणी नमुने आढळून आल्याने जलजन्य आजारांची लागण होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, असे आदेश आज जलव्यवस्थापन समितीच्या सभेत आरोग्य विभागाला देण्यात आले.

जलव्यवस्थापन समितीची सभा जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात झाली. समिती सदस्या पल्लवी सावकारे, प्रभाकर सोनवणे, पवन सोनवणे, लालचंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांच्यासह समिती सभापती, विभागप्रमुख उपस्थित होते. 

जिल्हाभरातून पाणी नमुने मागविण्याचे आदेशही देण्यात आले. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. यामुळे शुद्ध पाणीपुरवठा करावा. प्रत्येक गावात किमान तीन महिने शिल्लक राहील तेवढा ‘टीसीएल’ पुरवठा शिल्लक ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दहा टक्के निधी ‘जलयुक्त’व्यतिरिक्त!
‘जलयुक्त शिवार’ अभियानासाठी मिळणारा शंभर टक्के निधी ‘जलयुक्त’अंतर्गत असलेल्या गावांमध्ये खर्च न करता जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नसलेल्या गावांवरदेखील काही निधी खर्च करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी केली. त्यावरून सभेत १० टक्के निधी जलयुक्त अंतर्गत नसलेल्या गावांवर खर्च करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना ठराव पाठविण्यात येणार आहे.

नशिराबादला कूपनलिका 
समिती सदस्य लालचंद पाटील यांनी नशिराबाद गावाला पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे गावात १४ कूपनलिकांची मागणी केली. श्री. दिवेगावकरांनी कूपनलिका देण्याचे आश्‍वासन दिले. पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने शौचालयाचे सर्वेक्षण झाले असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ज्या व्यक्तीकडे शौचालय नसतानाही ते असल्याचे सर्वेक्षण करण्यात आले असून, नव्याने सर्वेक्षण करावे, अशी मागणी केली आहे.

अधिकारी सदस्यांचे ऐकत नाहीत...
अधिकारी जिल्हा परिषद सदस्यांचे ऐकत नाहीत, एखाद्या कामानिमित्त अधिकाऱ्यांकडे गेल्यास अपमानास्पद वागणूक मिळते, अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्यांची नेहमीच असते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देखील अधिकाऱ्यांबद्दलच तक्रारी करण्यात आल्या होत्या. आज झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत देखील सदस्यांनी अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी केल्या. यास अनुसरून अधिकाऱ्यांनी सदस्यांशी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना करण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी सदस्यांच्या अधिकाराचे भान ठेवून वागणूक द्यावी, अशी तंबी अधिकाऱ्यांना देण्यात आली.

Web Title: jalgav news uncleaned water supply