आता भाजीपाला गृहिणींच्या ‘बजेट’मध्ये!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

बाजार समितीत २५ टक्‍क्‍यांनी वाढली आवक; मिरची, टोमॅटो, कोथिंबीर महागली

जळगाव - शहरासह जिल्हाभरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक पूर्वीपेक्षा २५ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाला आता गृहिणींच्या ‘बजेट’मध्ये आला आहे. मात्र, अद्याप मिरची, टोमॅटो, कोथिंबीर व कांद्याची पात महागल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

पावसाने ओढ दिल्याचा परिणाम बाजारावर जाणवला होता. भाजी बाजारात दर कडाडले होते. दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. साधारणतः इतर सर्वच भाज्या १० ते १५ रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. शहरातील बाजारात रोज बटाटे, भोपळा, कारले, गिलकी, पालक, मेथी, पोकळा, वांगी यांसारख्या भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. भाज्यांचे दर स्थिर असले, तरी टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीच्या भावात मात्र काही प्रमाणात वाढ झाली आहे.

सध्या भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर स्थिर आहेत. काही भाज्यांचे दर मात्र वाढले आहेत. सध्या काही दिवस तरी भाव असेच राहण्याची शक्‍यता आहे.
- महेश पाटील, किरकोळ विक्रेता

Web Title: jalgav news vegetable in housewife budget