साईनगरातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जळगाव - मन्यारखेडा परिसरातील साईनगरात श्रीकृष्ण रोहिदास पवास (वय ४०) यांनी राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी बारापूर्वी घडली. सायंकाळी जिल्हा रुग्णालयात पवार यांच्यावर मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाइकांची रुग्णालय परिसरात गर्दी जमली होती. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

मूळ बीड येथील रहिवासी असलेले पवार हे पत्नी मीराबाई, बबलू व शिवा या मुलांसह गेल्या दीड-दोन वर्षांपासून मन्यारखेडा परिसरातील साईनगरात राहत होते. पवार खासगी प्रवासी वाहतुकीचे बसचालक म्हणून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचे. यातच गुरुवारी (१० ऑगस्ट) पत्नी मीराबाई व मुले बाहेरगावी गेल्याने पवार घरी एकटेच होते. त्यात आज सकाळी पवार यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. 

सुप्रिम कॉलनीतील मेहुणे जिजाबा विष्णू चव्हाण हे साईनगरात आले असता त्यांना पवार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी तत्काळ आजूबाजूच्या रहिवाशांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नशिराबाद पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस अधिकारी आर. टी. धारबळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करून रहिवाशांच्या मदतीने पवार यांना खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात नेले. सायंकाळी पवार यांच्या मृतदेहाचे विच्छेदन होऊन तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. 
यावेळी नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून, या घटनेची नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Web Title: jalgav news youth suicide