जळगावचा पारा चढलेलाच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

जळगाव - शहरात गेल्या दोन दिवसांपासून पारा चढतोच आहे. रस्त्यांवर उन्हाच्या चटक्‍यांमुळे, तर घरात उकाड्यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत. यात ‘महावितरण’तर्फे भारनियमन होत असल्याने नागरिकांमध्ये अधिकच संताप व्यक्त होत आहे.

तापमान मध्यंतरी कमी झाल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानाने अचानक उसळी घेतली. पारा तब्बल ४३ अंशांवर असल्यामुळे दुपारी उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर अघोषित संचारबंदीसारखी स्थिती असते. वाढत्या तापमानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे.

सायंकाळी सातनंतरच घराबाहेर
उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. सायंकाळी सातला उन्हाचा कडाका कमी झाल्यानंतर नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडतात. सायंकाळी सातनंतर शहरातील प्रमुख बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.

भारनियमनाचा फटका
वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त असताना त्यापासून सुटका मिळविण्यासाठी घरात पंखे, कूलरचा आसरा घेत आहेत; परंतु त्यातही ‘महावितरण’ त्यांना त्रास देत आहे. शहरातील अनेक भागांत भारनियमन होत आहे. त्यामुळे चक्क दोन-दोन तास वीज गायब असते. परिणामी घरात उकाड्याने नागरिकांचा जीव नकोसा होतो. बाहेर कडक ऊन, तर वीज गेल्यामुळे घरात उकाडा, अशा कोंडीत जळगावकर ऐन दुपारच्या वेळी सापडलेले आहेत. ‘महावितरण’ने भारनियमन कमी करून या दिवसांत सलग वीज द्यावी, अशी मागणीही होत आहे.

Web Title: jalgav temperature increase

टॅग्स