साक्ष देऊ नये म्हणून एकावर हल्ला 

साक्ष देऊ नये म्हणून एकावर हल्ला 

साक्ष देऊ नये म्हणून एकावर हल्ला 

जळगाव : मारहाणीच्या दाखल गुन्ह्यात न्यायालयात साक्ष देऊ नको, असे सांगितल्याने वाद होऊन म्हसावद (ता. जळगाव) येथे दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. लाठ्या-काठ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत दशरथ गंगाराम कोळी (वय 35, रा. खडसेनगर, म्हसावद) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दशरथ कोळी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. 
खडसेनगरात दशरथ कोळी हे पत्नी मंगलाबाई, आशाबाई तसेच मुलांसह वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील गंगाराम कोळी यांना तीन वर्षांपूर्वी चंद्रभान सोनवणे, बापू चंद्रभान सोनवणे या पिता-पुत्राने मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल असून, खटला सुरू आहे. यात दशरथ कोळी व त्यांचा भाऊ सुभाष कोळी हे साक्षीदार आहेत. 

तेरा जणांनी केली मारहाण 
मंगळवारी (ता.12) रात्री अकराच्या सुमारास लाला चंद्रभान सोनवणे, बापू चंद्रभान सोनवणे, संजय चंद्रभान सोनवणे व अनिल माचले हे दशरथ कोळी यांच्या घरी आले. दशरथला उद्देशून आमच्याविरुद्ध न्यायालयात साक्ष देऊ नको, असे सांगत दम दिला. दशरथने नकार दिल्याने थोड्याच वेळात चौघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर चौघेही निघून गेले. काही वेळाने सोनवणे कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक असे एकूण 13 जण पुन्हा दशरथ यांच्या घरावर चाल करून त्यांनी घराबाहेर उभ्या असलेल्या दशरथ कोळी यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. दशरथ यांना सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी मंगला कोळी, भाऊ संतोष कोळी, सुभाष कोळी, जितू कोळी यांना देखील मारहाण करण्यात आली. यानंतर जखमी अवस्थेत दशरथ कोळी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दशरथ कोळी यांच्या जबाबावरून अरुण चंद्रभान सोनवणे, लाला सोनवणे, बापू सोनवणे, संजू सोनवणे, अनिल माचले, रवी माचले, भुवा माचले, कैलास पिंटू सोनवणे, योगेश पिंटू सोनवणे, जितू जंगल भिल, शोभा बापू भिल, चंद्रभान सोनवणे, भिकूबाई चंद्रभान सोनवणे या 13 जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक बळिराम सपकाळे करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com