चाळीसगाव: झोपडीला लागलेल्या आगीत २० कोंबड्या जळून खाक

शिवनंदन बाविस्कर
बुधवार, 21 मार्च 2018

आग विझविण्यासाठी अंकुश चव्हाण, विजय रोकडे, संदीप पटेल, गोमा शिंदे यांच्यासह आसपासच्या शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. आगीत होरपळलेल्या तीन म्हशींपैकी दोन म्हशी या दोन लाख ८५ हजाराला तर एक म्हैस ८० हजाराला विकत घेतल्या आहेत. आगीमुळे सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकरी तुळशीराम महाजन यांनी वर्तविला आहे. 

पिलखोड (ता. चाळीसगाव) : सायगाव(ता. चाळीसगाव) शिवारात मंगळवारी(ता. 20) सकाळी पावणेनऊच्या सुमारास लागलेल्या आगीत झोपडी व २० कोंबड्या जळून खाक झाल्या. शिवाय आगीत तीन म्हशी व शेळी गंभीर जखमी झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजु शकले नाही. मात्र, यामुळे सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्याने वर्तविला आहे. 

सायगाव (ता. चाळीसगाव) येथील रहिवारी तुळशिराम कोंडु महाजन यांची सायगाव शिवारात शेती आहे. ते मंगळवारी(ता. 20) नेहमीप्रमाणे सकाळी म्हशींचे दुध काढुन घरी गेले. त्याच दरम्यान सकाळी पावणेनऊच्या सुमारास शेतात असलेल्या झोपडीला अचानक आग लागली. त्यांच्या शेताशेजारी राहणाऱ्या गोमा शिंदे यांनी आग लागल्याचे सर्वप्रथम पाहिले. त्यांनी आरडाओरड करुन जवळच्या काही लोकांना आग विझविण्यासाठी बोलावले. संदीप पाटील यांनी तुळशिराम महाजन यांना आगीची माहिती दिली. त्यानुसार ते तातडीने शेतात आग विझविण्यासाठी आले. 

आगीने पेट घेतल्याने झोपडी पुर्णपणे जळुन खाक झाली. त्यात असलेली शेती अवजारांची राख झाली. झोपडीजवळच्या गोठ्यात बांधलेली जनावरे देखील होरपळी. गोठ्यात एकुण आठ म्हशी, गाई, शेळी व कोंबड्या होत्या. यात तीन म्हशी व एक शेळी आगीत होरपळल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. शिवाय वीस गावरान कोंबड्या देखील यात भस्मसात झाल्या.

आग विझविण्यासाठी अंकुश चव्हाण, विजय रोकडे, संदीप पटेल, गोमा शिंदे यांच्यासह आसपासच्या शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. आगीत होरपळलेल्या तीन म्हशींपैकी दोन म्हशी या दोन लाख ८५ हजाराला तर एक म्हैस ८० हजाराला विकत घेतल्या आहेत. आगीमुळे सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकरी तुळशीराम महाजन यांनी वर्तविला आहे. 

दरम्यान, आगीचे कारण समजु शकले नाही. तलाठी गणेश लोखंडे यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा केला. त्यामुळे नुकसाग्रस्त महाजन यांनी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Web Title: jalgoan news fire in chalisgaon hens dead