'गिरणा'च्या पाण्यासाठी आजपासून उपोषण

दीपक कच्छवा
सोमवार, 26 मार्च 2018

कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) येथील धरणात 'गिरणा' चे पाणी टाकण्याच्या ग्रामपंचायत ठरावांना केराची टोपली दाखवत कुठलीच दखल घेतली नाही.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : कृरष्णापुरी (ता.चाळीसगाव) येथील  धरणात गिरणा चे पाणी टाकण्याची दखल घेतली नसल्याने परिसरातील ग्रामस्थासह शेतकरी आजपासून चाळीसगाव तहसील समोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) येथील धरणात 'गिरणा' चे पाणी टाकण्याच्या ग्रामपंचायत ठरावांना केराची टोपली दाखवत कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे परिसरातील वरखेडे, दरातांडा, कृर्षणापुरी तांडा, लोंढे तांडा या भागातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पाणी देण्यासंदर्भात कुठलीच हालचाल होत नसल्याने आजपासून तहसील कचेरीजवळ शेतकरी उपोषणाला बसणार आहेत.

Web Title: Jalgoan news Girna Dam water agitation