जिल्ह्यातील 2400 बोगस रेशनकार्ड रद्द 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

जिल्ह्यातील 2400 बोगस रेशनकार्ड रद्द 

जिल्ह्यातील 2400 बोगस रेशनकार्ड रद्द 

जळगाव  जिल्ह्यात पुरवठा विभागाने सुरू केलेल्या बोगस रेशन कार्डधारक मोहिमेत तब्बल 2 हजार 429 रेशनकार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली. यामुळे आता अंत्योदय व विशेष प्राधान्य असलेल्या कुटुंबांचा नव्याने समावेश करण्यात येणार आहे. रद्द केलेल्यांमध्ये 431 अंत्योदय योजनेतील तर 1 हजार 998 प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारक आहेत. 
जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस रेशनकार्ड असल्याच्या तक्रारी पुरवठा विभागास प्राप्त झाल्या होत्या. काहींनी पुरावे नसताना रेशनकार्ड तयार केले होते. पुरवठा विभागातर्फे विशेष मोहीम राबवून बोगस रेशनकार्डधारकांचे रेशन कार्ड रद्द केले आहे. बोगस रेशन कार्डधारकांमुळे अनेक पात्र कुटुंबीयांना स्वस्त धान्य मिळत नव्हते. आता मात्र जी पात्र कुटुंबीय आहेत, अशांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ देता येणार आहे. लवकरच पात्र कुटुंबीयांना शिधापत्रिका दिल्या जातील. 

आकडे बोलतात.... 
जिल्ह्यातील स्थिती 
अंत्योदय रेशनकार्ड संख्या--1 लाख 35 हजार 108 
प्राधान्य कुटुंब कार्डधारक--4 लाख 70 हजार 46 
केशरी कार्डधारक--3 लाख 6 हजार 535 
पांढरे कार्डधारक-----74 हजार 84 
-----------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon marath news bogas reshen kard