जिल्ह्यातील स्थानिक संस्था  कॉंग्रेसच्या ताब्यात घेणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

जिल्ह्यातील स्थानिक संस्था 
कॉंग्रेसच्या ताब्यात घेणार 

जळगाव  : जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांत असलेल्या खुर्च्या आता खेचून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी सात पिढ्यांची संपत्ती जमविण्यासाठी राजकारणात आलो नाही. जिल्ह्यात कॉंग्रेस जिवंत ठेवण्याचे काम सामान्य कार्यकर्त्यांनीच केल्याने मी विजय संपादित करू शकलो, असे मत कॉंग्रेसचे नवनिर्वाचित आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. 

जिल्ह्यातील 11 मतदारसंघांतून एकमेव रावेरची जागा लढविलेल्या कॉंग्रेसने ती शिरीष चौधरींच्या रूपाने जिंकली असून, त्याबद्दल कॉंग्रेस भवनात आज त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्रभारी हेमलता पाटील, ज्ञानेश्‍वर महाजन, उदय पाटील, सलीम पटेल, अविनाश भालेराव, राजीव पाटील, सुलोचना वाघ, डॉ. ए. जी. भंगाळे, राहुल मोरे आदींसह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. 

आमदार चौधरी म्हणाले, की जिल्ह्यात कॉंग्रेसने विकासाचा पाया रचला असून, आता जनतेला भूलथापा देणाऱ्यांचे सरकार नकोय. "अपना टाइम आ रहा है...' असे उद्‌गार काढल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा देत कॉंग्रेस भवन दणाणून सोडले. 

मनोबल वाढविणारा विजय : डॉ. तांबे 
डॉ. तांबे म्हणाले, की जनता भाजप सरकारला कंटाळली असून, जिल्ह्यात कॉंग्रेसने शंभर टक्के यश मिळविले आहे. याचे श्रेय कार्यकर्त्यांना देत आता पुढील लक्ष लोकसभा निवडणुकीवर असून, त्याची तयारी करण्याचा आदेश त्यांनी दिला. रावेर मतदारसंघातील विजयाने पुन्हा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असून, त्यांनी आमदार शिरीष चौधरी यांचा शुभेच्छा देत सत्कार केला. डॉ. उल्हास पाटील, संदीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon marathi news congres mla shrish shodhari